आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासनाच्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत निरुत्साह:शहरातील 7, मोहोळ 2, माढ्यातील एका मंडळाचा सहभाग

सोलापूर14 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

गणेशोत्सवात विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवणाऱ्या मंडळांनी उत्कृष्ट मंडळाच्या पुरस्कारांसह, राज्यासह, जिल्हास्तरावर मोठ्या रकमेचे बक्षीस, पुरस्कारांची घोषणा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहिर केली होती. नोंदणीसाठी २ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली. पण, शासनाच्या त्या स्पर्धांबाबत शहर व जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा निरुत्साह दिसून आला. सोलापूर शहर व जिल्ह्यातील फक्त दहा मंडळांनी स्पर्धांमध्ये सहभाग घेतला.

कोरोनाच्या प्रादुर्भाव संपल्यामुळे यंदाच्या वर्षी सर्व सण व उत्सव मोठ्या उत्साहात, दणक्यात करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्यातील सत्तातांतर, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सवाकडे सत्ताधारी शिवसेना-भाजप युती सरकारने विशेष लक्ष केंद्रीत केले होते. या उत्सवाच्या निमित्ताने गणेशोत्सव मंडळासाठी जिल्हा ते राज्यस्तरावर स्पर्धांचे आयोजन करीत मोठ्या बक्षिसांची घोषणा करण्यात आली होती.

थीमसाठी 150 गुण राखीव

पर्यवारणपूरक मूर्ती व सजावट, ध्वनी प्रदूषण मुक्त वातावरण, पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रद्धा निर्मुलन, सामाजिक सलोखा आदी विषयांवरील देखावे, स्वातंत्र्य चळवळी संदर्भातील देखावा, सजावट, पारंपारिक, देशी खेळाच्या स्पर्धांसह विविध थीमसाठी 150 गुण राखीव होते. परीक्षणासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र जिल्हास्तरीय समितीची नियुक्ती करण्यात आली होती.

दहा मंडळांचा सहभाग

सांस्कृतिक कार्य मंत्रालयातर्फे जाहिर करण्यात आलेल्या स्पर्धांबाबत प्रचार प्रसिद्धींसह, मंडळांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्याऐवजी प्रशासकीय यंत्रणांनी सोपस्कार उरकरला. त्यामुळे सोलापूर शहर व जिल्ह्यातून फक्त दहा मंडळांनी त्यामध्ये सहभाग घेतला.

सहभागी मंडळ

 • योगायोग तरुण मंडळ, शेळगी
 • यशोदीप युवा सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्था, विजापूर रस्ता
 • सोलापूर शहर सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ, मंगळवार पेठ पोलिस चौकी जवळ
 • श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळ, उत्तर कसबा
 • जय अंबिका दत्त तरुण मंडळ, लष्कर, बेडर पूल
 • सर्व-शांती युवा मित्रमंडळ, शांतीनगर
 • ओंकार बहुउद्देशीय क्रीडा सांस्कृतिक मंडळ, न्यू पाच्छा पेठ
 • नागराज मागासवर्गीय सेवाभावी मंडळ, मोहोळ
 • महाकालेश्वर बहुउद्देशीय समाजसेवी संस्था, मोहोळ
 • श्री जगदंबा गणेशोत्सव सांस्कृतिक, क्रीडा मंडळ, माढा

परीक्षणाचा एकत्रित अहवाल शासनाकडे

उपजिल्हाधिकारी तथा स्पर्धाप्रमुख अनिल कारंडे म्हणाले, सार्वजनिक मंडळांना शासनाच्या सांस्कृतिक कार्य मंडळाच्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याबाबत आवाहन केले होते. पण, ऐनवेळी ही स्पर्धांचे नियोजन झाले होते. नोंदणीसाठी मुदतवाढ मिळालेली, त्याबाबत मंडळांना कळवले होते. जिल्हास्तरीय समितीने मंडळांची पाहणी केली. परीक्षणाचा एकत्रित अहवाल तयार करून शासनाकडे सादर करण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...