आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चर्चेचे गुऱ्हाळ:हमीच्या मुद्द्यावर बायो एनर्जी कंपनीत सीबीजी निर्मितीविषयी चर्चा रखडलेली

सोलापूर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर रोडवरील महापालिकेच्या जागेत कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प आहे. तेथे रोज २४० टन कचऱ्यावर प्रक्रिया करून २ ते २.५ मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते. वीजनिर्मितीबरोबर तेथे ‘बायो सीएनजी’ म्हणजेच सीबीजी (कॉम्प्रेस्ड बायो गॅस) निर्मिती करण्यासाठी प्राथमिक स्वरूपात चर्चा सुरू आहे. तयार केलेला बायो सीएनजी घेण्याची हमी द्यावी आणि ते बायो सीएनजी सिटीबससाठी घ्यावी, अशी चर्चा कंपनी व महापालिकेत सुरू आहे.

गॅस तयार करण्यासाठी जैव कचरा कमी पडत असून, अतिरिक्त जैव कचरा संकलन करण्यासाठी शहर परिसरातील साखर कारखान्यातील कचरा, गावातील कचरा संकलन करण्याचा प्रयत्न सुरू केला. यासाठी महापालिका उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांनी प्राथमिक बैठक घेतली. बायो सीएनजी उत्पादन सुरू करण्याबाबत महापालिका आयुक्त पी. शिवशंकर अग्रेसर असले तरी अंतिम निर्णय झाला नाही. भोगाव कचरा डेपो येथे शहरातील २४० ते ३०० टन रोज कचरा जात असून, त्यातून वीजनिर्मिती केली जाते. त्या प्रकल्पाची रोजची ४०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. त्यामुळे १०० टन जैव कचरा कमी पडत आहे. त्या कंपनीस अतिरिक्त कचरा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने साखर कारखाना प्रतिनिधीची बैठक घेतली. कारखान्यातील कचरा बायोएनर्जी कंपनीस देण्यासाठी चर्चा सुरू आहे.

केंद्रात बायो सीएनजी निर्मिती होईल, पण ते विकत घेण्याची हमी पाहिजे
बायोएनर्जी कंपनी सीएनजी गॅस तयार करेल पण ते घेण्यासाठी महापालिकेने हमी घ्यावी. सीएनजीवरील बस घेऊन त्यासाठी गॅस वापरता येईल. याबाबत महापालिका आयुक्त पी. शिवशंकर सकारात्मक आहेत आणि गॅस तयार करण्यासाठी कंपनीही सकारात्मक आहे, अशी कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.

‘पीएनजी’ पुरवण्याचे काम संथगतीने
शहरात घरोघरी घरगुती गॅस पुरवठा करण्यासाठी आयएफसी कंपनीच्या वतीने शहरात गॅस पाइपलाइन घालण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेकडून परवानगी दिली जात नाही. त्यामुळे पीएनजी गॅस पाइपलाइन कामास गती मिळत नाही.

गॅस निर्मितीविषयी प्राथमिक चर्चा
कचरा डेपो येथे बायो सीएनजी निर्मितीसाठी कचरा आवश्यक असून, त्यांना कचरा उपलब्ध देण्याबाबत चर्चा सुरू आहे. तेथे सीएनजी निर्मितीबाबत प्राथमिक चर्चा सुरू आहे. त्यामुळे तूर्तास हमीचा प्रश्न येत नाही.’’
मच्छिंद्र घोलप, उपायुक्त, महापालिका.

बातम्या आणखी आहेत...