आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवजयंती उत्सव:‘शिवराय संस्कार आणि शिक्षण’च्या 100 प्रती वाटप ; संस्कारामुळेच स्वराज्य निर्मिती : इंद्रजित घुले

मंगळवेढा9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहाजीराजे आणि जिजाऊ यांच्याकडे अपार क्षमता होत्या. गुणवत्ता होती. त्यांनी उच्चतम मनुष्यत्वाच्या प्राप्तीसाठी शिवरायावर शिक्षणाचे व इतर संस्कार केले. आणि स्वत: शिवरायांच्या ठिकाणी असलेली कुशाग्र बुद्धिमत्ता या सर्वांच्या मिलाफातून त्यांची जडणघडण कशी झाली? आदर्श राजा कसा असावा? यांची माहिती शिवराय संस्कार, शिक्षण या पुस्तकातून मिळते, असे प्रतिपादन कवी इंद्रजित घुले यांनी व्यक्त केले.

ते शिवप्रेमी चौकातील शिवालयामध्ये दररोज सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित पूजेवेळी बोलत होते. सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळास माजी अध्यक्ष प्रशांत गायकवाड यांच्या वतीने आ. ह. साळुंखे लिखीत ‘शिवराय संस्कार आणि शिक्षण’ या पुस्तकाच्या १०० प्रती भेट दिल्या.

या वेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य अजित जगताप, नगरसेवक राहुल सावंजी, प्रवीण खवतोडे, सार्वजनिक शिवजयंतीचे अध्यक्ष संभाजी घुले, सोमनाथ बुरजे, सतीश दत्तू, विजय हजारे, स्वप्निल फुगारे आदी मान्यवर उपस्थित होते.