आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:काझीकणबसच्या बसवेश्वर प्रशालेत विद्यार्थ्यांना सायकल वाटप; विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर हसू

चपळगांव9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्कलकोट तालुक्यातील काझीकणबस येथे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी यांचे स्वागतोत्सव करण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य स्कूल बॅग व तसेच परगांवहून येणाऱ्या विद्यार्थाना पंचवीस सायकल शाळेकडून वाटप करण्यात आले.अध्यक्षस्थानी सरपंच सिद्धाराम धर्मसाले उपसिथत होते.

केंद्रप्रमुख महादेव चव्हाण यांचे हस्ते सायकलींचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास उपसरपंच दत्तात्रय मुनाळे, ग्रा. पं. सदस्य नारायण बंदीछोडे, पोलीस पाटील दिपक मंठाळे, श्रीमंत जाधव, तंटामुक्त अध्यक्ष अशोक मजगे, शिवराज वाले, तानाजी धर्मसाले, विष्णु जाधव, महेश मजगे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते

बातम्या आणखी आहेत...