आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रीरामजन्मोत्सव समिती, सोलापूरच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी प्रभू श्रीरामांच्या पूर्णाकृती मूर्तींचे मोफत वाटप करण्यात आले. शिंदे चाैक परिसरातील शिवस्मारकच्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला. या वेळी व्यासपीठावर श्री. लक्ष्मण महाराज, मैंदर्गीचे श्री. नीलकंठ शिवाचार्य, श्री. सुधाकर इंगळे महाराज, वेदमूर्ती वेणूगोपाल जिल्ला, बसवारूढ मठाचे श्री. शिवपुत्र महाराज, श्री. विनोद महाराज सरवदे, श्री आकाश महाराज शिरते, संजय हंचाटे, शिवशंकर पुजारी, रंगनाथ बंकापूर, सुरेश पाटील, जगदीश पाटील, शिवानंद कल्लूरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीरामनवमीच्या पार्श्वभूमीवर याचे आयोजन होते. या वेळी संयोजक संजय साळुंखे, अक्षय अंजिखाने, सुधीर बहिरवाडे, सागर अतनुरे, संजय होमकर, यतिराज होनमाने, कल्याणराव चौधरी, प्रवीण वाले आदींनी परिश्रम घेतले. प्रस्तावना यतिराज होनमाने व अक्षय अंजिखाने यांनी केली. आभार सुधीर बहिरवाडे यांनी मानले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.