आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जनमंगल संस्थेच्या जीवनगौरव पुरस्कारांचे वितरण

पंढरपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जे स्वतःपुरता विचार करतात, ते स्वतःसाठी जगतात आणि जे समाजाचा विचार करतात, समाजाच्या हितासाठी काम करतात, सुखाचा आणि कुटुंबाचा त्याग करतात त्यांचा सन्मान होतो. असे सन्मान पुन्हा नव्या जोमाने समाजाची सेवा करण्याची प्रेरणा देतात, असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले.

शुक्रवारी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते मातोश्री सोजरबाई लक्ष्मण चिखलकर यांच्या स्मरणार्थ जनमंगल सामाजिक सांस्थेच्या जीवनगौरव पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या वेळी श्री विठ्ठल सहकारी कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील, माहिती अधिकार प्रशिक्षक शिवाजी पवार, महेश देवकते आदी उपस्थित होते.

या वेळी आमदार लंके म्हणाले, दिवसभरातील २० तास समाजातील सामान्य लोकांसाठी काम करतो म्हणूनच माझ्यासारखा सामान्य घरातील कार्यकर्ता केवळ ९ वर्षात सरपंच ते आमदार अशी झेप घेऊ शकला. गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरी खूप मोठी आहे. समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणे आवश्यक अशा प्रकारचे पुरस्कार सामाजिक कार्य करणाऱ्यांना बळ देतात, त्यामुळे असे पुरस्कार समाजाच्या हिताचे ठरतात.

या वेळी अभिजित पाटील म्हणाले, जनमंगल सामाजिक संस्थेने ज्यांना पुरस्कार देऊन गौरवलेले आहे. त्यांचे कार्य आणखी जोमाने चालू राहील, यासाठी हा पुरस्कार प्रेरणा देईल. चिंचणीसारखे आदर्श गाव उभा करणाऱ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान केल्यानंतर तालुक्यात आणखी २५ आदर्श गावे उभा राहतील. या वेळी राष्ट्रवादीचे अप्पासाहेब थिटे, संदीप मांडवे, प्रा. महादेव तळेकर, रणजित बागल, बाळासाहेब कोरके, रमेश शिंदे, वाखरीचे उपसरपंच सोमनाथ पोरे, अविनाश श्रीखंडे, सौरभ चिखलकर, अण्णासाहेब पवार आदी उपस्थित होते. जनमंगल सामाजिक संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब लक्ष्मण चिखलकर यांनी प्रास्ताविक केले. दत्तात्रय खपाले यांनी स्वागत केले. अंकुश गाजरे यांनी सूत्रसंचालन केले.

शाळा, उद्योजक, शेतकरी, पत्रकारांना आदर्श पुरस्कार
या वेळी आदर्श शिक्षक प्रशांत कोळसे, युवा उद्योजक बाळकृष्ण टरले, आदर्श माता वैजयंता पवार, आदर्श पत्रकार नवनाथ पोरे, आदर्श ग्रामसेवक सतीश चव्हाण, आदर्श आरोग्य सेवक गंगाराम बगले, आदर्श शेतकरी दत्तात्रय भोसले, आदर्श समाजसेवक सुशेन गरड, आदर्श गाव-चिंचणी (ता. पंढरपूर) आदर्श शाळा - जि.प. शाळा पांढरेवाडी यांचा जनमंगल जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला. आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते सर्वांना आदर्श पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...