आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पशुसंवर्धन श्रेणीचा स्तुत्य उपक्रम‎:नान्नजमध्ये 150 पशुपालकांना‎ मिनरल मिक्सर, कॅल्शियमचे वाटप‎

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर सोलापूर‎ नान्नज येथील माणुसकी बहुउद्देशीय सामाजिक‎ संस्था व नान्नज पशुसंवर्धन विभाग यांच्या वतीने‎ मोफत जनावरांचे आरोग्य शिबिराचे आयोजन‎ करण्यात आले होते.लक्ष्मी प्रतिमेचे व गायीच्या‎ पूजनाने या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या‎ शिबिरात पशुधन विकास अधिकारी एम. बनगर यांनी‎ जनावरांची देखभाल कशी करावी, जनावरांना चारा‎ कसा द्यावा, मिनरल मिक्सर पावडरचे फायदे व‎ दुभत्या, जनावरांना कॅल्शिअमचे फायदे, लाळ्या‎ खुरखुत्या रोग, लंपी या आजाराचे परिणाम या विषयी‎ उपस्थित पशुपालकांना मार्गदर्शन केले.‎

लसीकरणाच्या संदर्भात सविस्तर पशुसंवर्धनाविषयी‎ जनजागृती संदर्भात काही उपाययोजना, दुग्ध‎ जनावरांची व भाकड जनावरांची माहिती पशुधन‎ विकास अधिकारी डॉ. भाग्यश्री राठोड यांनी दिली.‎ यावेळी माणुसकी बहुउद्देशीय सामाजिक संस्था व‎ नान्नज पशुसंवर्धन श्रेणी वतीने १५० दूध उत्पादक‎ शेतकऱ्यांना मिनरल मिक्स्चर, कॅल्शियम व इतर‎ मोफत साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी‎ श्रीकांत मुळे, रंजित बोंगे, गणेश देवकुळे, ब्रह्मदेव‎ गवळी, ग्रा.पं सदस्य शिवाजी आवटे, शिरीष म्हमाणे,‎ विनोद माने, भारत बोंगे, भाग्यश्री धुळे, सागर माने,‎ राजू ताकभाते, नंदकुमाार विभुते, दयानंद डांगे व इतर‎ शेतकरी नागरिक उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...