आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाटप:ग्रामदैवत श्री सिद्धमल्लिकार्जुन प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे केले वाटप

सोलापूर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामदैवत श्री सिद्धमल्लिकार्जुन प्रतिष्ठानच्या वतीने हुशार व गरजू विद्यार्थांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. यामध्ये समीक्षा अप्पासाहेब अजगुंडे, अमृता संतोष रड्डे, गणेश सिध्दाराम सरसंबे, जगदीश हिरेमठ या विद्यार्थ्यांना काशी पीठीचे जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते शिष्यवृत्ती देण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शिवप्रसाद दामा उपस्थित होते. डाॅ.मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांनी आपण कितीही शिकून मोठे झालो तरी समाजाचे ऋण फेडणे व समाजासाठी आपले योगदान देणे गरजेचे आहे. समाजातॉ हुशार विद्यार्थी आहेत.

पैसे नसल्याने शिक्षणापासून वंचित आहेत. अशा हुशार व गरजू विद्यार्थांना मठाकडून शिष्यवृती दिली जाते, हे गौरवास्पद आहे. हा स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल संयोजकांचे कौतुक केले. प्रास्ताविक प्रतिष्ठानचे संयोजक गणेश चिंचोळी यांनी केले. राजेश निला यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी सचिन शिवशक्ती, विकास कस्तुरे, हनुमंत गौडा पाटील व बसवेश्वर स्वामी आदींनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...