आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोवर संसर्गामुळे आरोग्य विभाग अलर्ट:प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू, अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात मुंबई शहर तसेच काही जिल्हयामध्ये गोवरचा विषाणूचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू झाल्या आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव यांनी दिली.

शुक्रवारी आयोजित जिल्हा कृतिदल आढावा बैठकी घेण्यात आली. या बैठकीला जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदिप ढेले, अतिरिक्त् जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. सोनिया बागडे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी, डॉ. अनिरुध्द पिंपळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी तालुका आरोग्य अधिकारी व जिल्हास्तरीय कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सुचना केल्या आहेत की, जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे व घाबरुन न जाता गोवर टाळणेसाठी गोवर लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करणे. तसेच जिल्हयातील उसतोड मजूर, वीटभटृटी कामगार, वाडया-वस्तया, इ. ठिकाणी अतिजोखमीच्या गावांतील भागांचे संशयित रुग्णाचे शोध घेणे, जागतिक आरोग्य संघटना यांच्या माहितीन्वये गोवर हा हवेच्या माध्यमातून पसरतो, खोकल्याद्वारे हवेमार्फत याचा प्रसार होतो.

गोवरच्या विषाणूंनी शरीरात प्रवेश केल्यानंतर सात ते दहा दिवसांनी लक्षणे दिसण्यास सुरुवात होते सुरुवातीस ताप व खोकला त्यानंतर सर्दी, डोळे लाल होणे, अंगावर पुरळ येतात आणि ते कानाच्या मागे, चेहरा, छाती पोटावर पसरतात. जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी याबाबत वारंवार आढावा घेतला आहे. तसेच ते पाठपुरावादेखील करत आहेत. काही तालुक्यांचे रिपोर्टिंग प्रलंबित आहे त्यांनी तात्काळ रिपोर्टिंग अद्ययावत करणेची कार्यवाही पूर्ण करावी. याबाबत तालुका अधिकारी यांना सुचना स्वामी यांनी दिल्या .

बातम्या आणखी आहेत...