आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेम विवाह:पैशांवरून गैरसमजुतीतून वितुष्ट, समुपदेशाने दांपत्यात पॅचअप; संसाराचा गाडा पुन्हा मार्गी

सोलापूर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पती-पत्नी दोघेही उच्चशिक्षित आयटी इंजिनिअर. दोघांनाही दीड लाखाहून अधिक पगार. चार वर्षे दोघांचे एकमेकांवर प्रेम. ८ महिन्यांपूर्वी सोलापुरात दोघांचा थाटातमाटात विवाह झाला पण चार महिन्यांतच पैशासाठी दोघात वाद सुरू झाले. दोघे जण विभक्त राहू लागले. दरम्यान, पत्नीने कौटुंबिक न्यायालयात नांदवायला नेण्यासाठी अर्ज केला आणि न्यायालयाच्या समुपदेशानंतर दोघांचा पुन्हा संसार फुलला आहे.

रेवा (नाव बदलले आहे) ही सोलापुरातील पंचवीस वर्षीय तरुणी. आई-वडिलांना एकुलती एक. एमटेक पदवी घेऊन पुण्यातील नामांकित कंपनीत सहाय्यक मॅनेजर पदावर काम करत आहे. रणवीर (नाव बदलले आहे) पुण्यात राहणारा, तो नामवंत कंपनीत अभियंता म्हणून काम करतोय. दोघांत चार वर्षे प्रेमसंबंध होते. डिसेंबर २०२१ मध्ये मुलीच्या आई-वडिलांनी सोलापुरात लग्न लावून दिले. पुण्यात संसार सुरू झाला. चार महिन्यांत पैशावरून विभक्त राहू लागले.पूर्ण पगार पती मागत होता. पत्नी म्हणायची यावर माझाही हक्क आहे. यावरून दोघांत वाद सुरू झाले. वेगळे राहू लागले. आईवडिलांनी यावर तोडगा म्हणून सोलापूर कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला.

कसे झाले समुपदेशन
मुलीच्या आई वडिलांनी तोडगा म्हणून सोलापूर कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला की मुलगी नांदायला तयार आहे. न्यायालयाने सामोपचारासाठी दोघांना बोलावले, पैशापेक्षा आपले नातेसंबंध महत्त्वाचे आहेत. पैसा आज आहे, तर उद्या नाही. आपला संसार जोडला तर आपण आनंदाने राहू शकता. कायदेशीर बाबीनुसार पत्नीचा पगार ती कुणालाही देऊ शकते हा तिचा अधिकार आहे यानंतर दोघात समेट झाला. आज दोघांचा संसार सुरू झाल्याची माहिती अर्जदार महिलेच्या वतीने काम पाहिलेले अॅड. श्रीनिवास कटकूर यांनी सांगितली.

बातम्या आणखी आहेत...