आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गटारीचे पाणी टोल प्लाझात टाकण्याचा इशारा:मोहोळ येथे उड्डाणपुलाखाली गटारीचे काम करा, अन्यथा आंदोलन करू

मोहोळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील उड्डाणपुलाखाली गटारीचे पाणी साचते. सावळेश्वर टोल प्लाझाकडून वारंवार दुरुस्ती करूनही तेथे घाण पाणी साचते. त्याची दुरुस्ती करून कायमस्वरूपी पाणी बंद करा. अन्यथा त्याच गटारीचे पाणी आणून टोल प्लाझाच्या कार्यालयात टाकू, असा इशारा माजी नगरसेवक सत्यवान देशमुख यांनी दिला.

शिवाजी चौकात एकाच ठिकाणी गेल्या अनेक महिन्यांपासून गटार फुटून ते पाणी पंढरपूरच्या दिशेने वाहत आहे. शौचालयाचे व घाणीचे पाणी रस्त्यावर तळ्याप्रमाणे साचते. याबाबत सावळेश्वर टोल प्रशासनाला संपर्क केल्यानंतर काम केल्याचा दिखावा करत निकृष्ट दर्जाचे खडी, डांबर वापरून त्या ठिकाणी दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला जातो.

बातम्या आणखी आहेत...