आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:संपन्न जीवनासाठी वेळेवर करा कामे; मौलाना ताहेर बेग यांचे प्रतिपादन

सोलापूर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्यांना वेळेचे महत्त्व कळत नाही, त्यांची वेळही दखल घेत नाही. अशी माणसे नंतर रडत बसतात. सुखी-संपन्न जीवन जगायचे असेल तर प्रत्येक काम वेळेवर करत चला, असे आवाहन मौलाना ताहेर बेग मुहम्मदी यांनी केले. फराश फाउंडेशनच्या वतीने इंतेखाब फराश संपादित “निकाह या तमाशा” या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ इंप्रियल गार्डन येथे पार पडला. यावेळी मौलाना बेग बोलत हाेते. प्राचार्य इ. जा. तांबोळी, योगीन गुजर, अय्यूब नल्लामंदू, नूर ट्रस्टचे नजीर मुन्शी, जमीर शेख आदी उपस्थित होते.

इंतेखाब फराश यांनी प्रस्ताविक केले. मतीन बागबान यांनी स्वागत केले तर खाजा भाई बागबान यांनी आभार मानले. या वेळी अयाज शेख ,मजहर अल्लोळी, अ सत्तार बिद्री, गौसपाक शेख, सलीम शेख, जावीद शेख उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...