आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहद्दवाढ भागात ड्रेनेजलाइन टाकल्यानंतर युजर चार्जेस वसूल करणे थांबवणे अपेक्षित होते. पण तिथे महापालिका सफाईपट्टी आणि युजर चार्जेस वसूल करत आहे. म्हणजे एकाच कामासाठी महापालिका दोनदा कर वसूल करत आहे. तसेच पुरेसा साठा असतानाही रोज पाणीपुरवठा करण्याऐवजी चार ते पाच दिवसांआड केला जात आहे.
पण पाणीपट्टी मात्र ३६५ दिवसांची वसूल केली जाते. दुसरीकडे वाढीव बिलाच्या नोटिसा मिळकतदारांना दिल्या असून, त्यावरील मोठे आकडे पाहून नागरिक धास्तावले आहेत. शहरात पाणीपुरवठा होणारे दिवस आणि त्यासाठी आकारली जाणाऱ्या पाणीपट्टीचे दर पाहता दिवसानुसार त्याचे वार्षिक दर १३ हजार रुपये पाणीपट्टी होतो. सफाईपट्टी असताना उपविधी कराचा दुहेरी भुर्दंड सुरू आहे. हद्दवाढ भागात ड्रेनेजलाइनपोटी लावण्यात आलेला युजर चार्ज संपलेला असताना त्याची वसुली सुरूच आहे. मिळकतदारांना चार हजार येणाऱ्या कराची रक्कम लाखांवर येऊ लागली आहे. यामुळे नागरिक धास्तावलेले आहेत.
शहरात २००५ पूर्वीच्या बांधकामास वाढीव कर येणार नाही, असे महापालिका प्रशासन सांगत आहे. मात्र बिले चार हजार रुपयांवरून लाखावर येऊन पोहोचली आहेत. घराची मोजणी न करता बिले आकारण्यात येत आहेत. मान्य नसलेला कर नागरिकांच्या माथी मारला जात आहे. याच्या वसुलीसाठी महापालिकेने मिळकतदारांना नोटिसांचे वाटप सुरू केले आहे. ३५ हजार जणांना नोटीस देण्यात आली आहे. अन्य ८० हजार नोटीस वाटप सुरू आहे. यावर नागरिकांनी हरकत घेणे सुरू केले आहे. आतापर्यंत ३ हजार जणांनी हरकती घेतल्या आहेत.
औरंगाबादमध्ये ५० टक्के पाणीपट्टी माफी : औरंगाबादमध्ये ५० टक्के पाणीपट्टी माफ करण्याची घोषणा तेथील पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केली. सोलापुरात पाच दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. मग माफी का नाही? असा प्रश्न उपस्थित केला जातो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.