आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:विद्यापीठाच्या डझनभर चुका; कारवाई एका कंत्राटी प्राध्यापकावर

अजित बिराजदार | सोलापूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये विद्यापीठ परीक्षा विभाग, अधिकारी यांच्याकडून डझनभर चुकांची मालिका सुरू राहिली. प्रत्यक्षात कडक कारवाई करत असल्याचे दाखवून एम.ए. उर्दूच्या एका कंत्राटी प्राध्यापकावर दंडात्मक व परीक्षा कामकाजातून काढणे इतकीच कारवाई विद्यापीठाने केली. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रश्नपत्रिका उशिरा मिळत होत्या. अधिविभागाच्या बैठक व्यवस्थेत त्रुटी होत्या. मात्र नियमित प्राध्यापक, परीक्षा केेंद्राच्या चुकांवर सध्या तरी कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही.

प्रश्नपत्रिका उशिरा मिळत होत्या, बैठक व्यवस्थेत ताळमेळ नव्हता, त्याबद्दल सोयीस्कर मौन १ अनेक परीक्षा केंद्रावर परीक्षा वेळेवर सुरू न होणे यंदा पुन्हा पुन्हा घडले. २ विद्यापीठ परीक्षेत प्रश्नपत्रिका पाठविली तरी बहुपर्याय न देणे. ३ ईएनटीएसी परीक्षेतील आन्सर की मध्ये तब्बल २६ चुका असणे. ४ एम.एस्सी. गणिताची प्रश्नपत्रिका टायपिंग न करता हस्तलिखित देणे. ५ चतुर्थ सत्राची परीक्षा असताना तृतीय सत्र परीक्षेचा पेपर लिंक पाठविणे. ६ हॉल तिकीटवर चुकीचा महिना देणे. ७ एम. ए. मराठीच्या प्रश्नपत्रिकेत एकच प्रश्न दोन वेळा असणे. ८ बी.ए. इंग्रजी व बी.कॉम. इंग्रजी या परीक्षा वेगवेगळ्या दिवशी असल्या तरी त्याची प्रश्नपत्रिका एकच असणे ९ एम.ए. उर्दू प्रश्नपत्रिका हस्तलिखित देणे ही परीक्षा विभागाची त्रुटी आहे. अन्यथा प्राध्यापकाने पर्यायावर खुणा केल्या तरी ही उपयोग झाला नसता. कंत्राटी प्राध्यापकावर कारवाई केल्यासारखे दाखवून इतर गंभीर त्रुटींवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न. १० बीए तृतीय वर्ष मराठी प्रश्नपत्रिकेत अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न देणे. ११ विद्यापीठ अधिविभागात बैठक व्यवस्थाच नसणे, क्षमतेबाहेर विद्यार्थी संख्येचा अंदाज नसणे. १२ परीक्षा वेळापत्रक, पॅटर्न, पद्धत, नियमावली सतत बदलणे.

परीक्षा केंद्रात दिसल्याने थेट पोलिस तक्रार, विद्यापीठाचे करून घेतले हसे
विद्यापीठ अधिविभागात परीक्षा गोंधळ का आहे, हे विचारण्यासाठी मनसेे विद्यार्थी संघटनेचे नेते राहुल पाटील गेले असता केवळ परीक्षा केंद्रात दिसला म्हणून सरकारी कामात हस्तक्षेप केल्याची तक्रार पोलिस स्टेशनला दिली. अवघा परीक्षा विभाग अधिकारी, संचालक स्वत: उपस्थित होते. हस्तक्षेप म्हणजे काय केले, धक्काबुक्की केली का ? काही नुकसान केले का? उलट सुलट उत्तरे दिली का ? असे पोलिसांनी विचारले, यावर परीक्षा मंडळाचे संचालक डाॅ. शिवकुमार गणपूर नाही म्हणाले. यावर पोलिसांनीही मग १५१ ची नोटीस देऊन सोडले. हास्यास्पद पद्धतीने विद्यापीठ कारवाईसाठी पुढे येते, हेच यातून दिसून आले.

बातम्या आणखी आहेत...