आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‎ परीक्षा:डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या‎ परीक्षा 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार‎

सोलापूर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर‎ औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर‎ मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित‎ महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमाच्या‎ परीक्षांना २२ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. या‎ परीक्षा प्रथम वर्षच्या प्रथम सत्र वगळून होत‎ असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन‎ मंडळाचे संचालक डॉ. गणेश मंझा यांनी दिली‎ आहे.‎ बी.ए., बी.एस्सी आणि बी.कॉम अभ्यासक्‎ रमांच्या द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षांचे‎ वेळापत्रक जारी करण्यात आले आहे.

जालना,‎ उस्मानाबाद, बीड आणि औरंगाबाद या चार‎ जिल्ह्यातील २४० परीक्षा केंद्रांवर ३,१२,२०९‎ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. मागील वर्षी प्रथम‎ वर्षातील प्रथम सत्रात अनुत्तीर्ण झालेल्या‎ विद्यार्थ्यांचीही रिपिटर म्हणून परीक्षा घेतली‎ जाणार आहे. कला व मानव्य विद्याशाखेचे‎ एकूण १, ४८, ९१७ विद्यार्थी परीक्षा देतील.‎ वाणिज्य व व्यवस्था नशास्त्र विद्या शाखेतील‎ ४३, ३६९ जण परीक्षा देणार आहेत. विज्ञान व‎ तंत्रज्ञानाचे सर्वाधिक १, १९, ९२३ परीक्षार्थी‎ आहेत. प्रथम वर्ष व अन्य व्यावसायिक पदवी,‎ अभ्यासक्रम, पदव्युत्तर अभ्यासक् रमांच्या‎ परीक्षा डिसेंबरमध्ये घेण्यात येणार असल्याचे‎ डॉ. मंझा यांनी सांगितले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...