आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आषाढी वारी:डॉ. धवलसिंह मोहितेंकडील बलराज अश्व संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात

सोलापूर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज दुपारी लाखो वारकऱ्यांच्या समवेत सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवत आहे. कोरोनानंतर होणाऱ्या या सोहळ्यात बाबत वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. वारी सोहळ्यातील वैशिष्ट्ये असते अश्वाचे रिंगण. यात डॉ. धवलसिंह मोहितेकडील बलराज अश्व संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात जाणार आहे.

जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील एक अश्व अकलूज (सोलापूर ) येथील दिवंगत प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या कुटुंबातील असतो. मागील 35 वर्षांपासूनची ती प्रथा त्यांचे चिरंजीव डॉ. धवलसिंह मोहिते यांनीही जपली आहे. सोहळ्यात दाखल झालेल्या अश्वाचे विधिवत पूजन अकलूज येथे पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते यांच्या हस्ते झाले. त्यानंतर अश्वाने देहूकडे प्रस्थान ठेवले. यंदाच्या वर्षी डॉ. धवलसिंह मोहिते यांच्याकडील बलराज नावाचा अश्व सोहळ्यात दाखल झाला आहे.डॉ. मोहिते यांनाही त्यांच्या वडिलांसारखी जातीवंत घोड्याचा सांभाळ, घोडेस्वारीचा छंद आहे. त्यांच्याकडे अनेक नामांकित जातीचे घोडे आहेत. ते स्वतः अश्वाचे व्यवस्थापन बाबत खूप सजग असतात.

असा आहे बलराज..

महाराणा प्रताप यांच्या चेतक अश्वाचा हा वारसदार आहे. तीन वर्षांचा बलराज सुलक्षणी देखणा आहे. मारवाड जातीचा चपळ, रुबाबदार अश्व आहे. चेतक अश्वाचे देशभरात चार वंशज असून त्यामधील एक बलराज आहे. संत तुकाराम महाराज संस्थानने दिवंगत प्रतापसिंह मोहिते यांच्याकडे सोहळ्यासाठी अश्व देण्याचा प्रस्ताव ठेवला होता, तेव्हापासून दरवर्षी सोहळ्यासाठी त्यांच्याकडील जातीवंत, रुबाबदार अश्व सोहळ्यासाठी देण्यात येतात. आमचे भाग्य मागील अनेक वर्षांपासून जगद्गुरू तुकोबांच्या सोहळ्यासाठी सेवेची संधी मिळते, अशी भावना पद्मजादेवी मोहिते यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...