आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधी जयंतीचे औचित्य:डॉ. भिशीकर यांना रानडे पुरस्कार

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेवासदन संस्थेचा वर्धापन दिनानिमित्त रमाबाई रानडे पुरस्कार डॉ. स्वर्णलता भिशीकर यांना आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला गांधी जयंतीचे औचित्य साधून हा कार्यक्रम झाला. यावेळी स्वर्णलता भिशीकर यांच्या कार्याची ओळख मुलाखत रुपात विद्यार्थिनींना करून देण्यात आली. किल्लारी भूकंपात हराळी गावात जे लोक बेघर झाले त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी अविनाश धर्माधिकारी यांच्या समूहा सोबत त्यांनी काम केले. सोलापूर मधील बालकामगारांसाठी विशेष कार्य केले. त्यांची मुलाखत डॉ. प्रिया निघोजकर यांनी घेतली.

कार्यक्रमाची सुरुवात रमाबाई रानडे, राष्ट्रपिता महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चिटणीस वीणा पतकी यांनी केले. प्रमुख पाहुण्या आमदार प्रणिती शिंदे व डॉ.स्वर्णलता भिशीकर यांचा सत्कार संस्थेच्या अध्यक्षा शीला मिस्त्री यांनी केला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा शीला मिस्त्री, डॉ. श्रीकांत येळेगावकर, राजश्री रणपिसे, संजिवनी नगरकर, संगीता आपटे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचलन अमित देशपांडे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...