आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासाई समर्थ विद्या विकास संस्थेच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये संस्थेमार्फत कौशल्य महोत्सव घेण्यात आला. संस्थेच्या प्रशिक्षणार्थी महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्यातील सुप्त कला कौशल्य विकसित व्हावे या दृष्टीने ड्रेस मेकिंग व डिझायनिंग स्पर्धा झाली. या स्पर्धेत महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला व ध व नवनवीन कल्पना शक्ती वापरून सुंदर ड्रेस डिझाइन व हस्तकला प्रदर्शित केले. कर्तृत्व सन्मान पुरस्कार व बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी पोलिस उपायुक्त डॉ.दीपाली काळे होत्या. मुख्य अतिथी म्हणून सहाय्यक आयुक्त सचिन जाधव , तहसीलदार प्रियंका ढोले यांची प्रमुख उपस्थिती होती.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सत्यम दुधनकर , सचिव रविराज मुसळे , कार्यक्रम समन्वयक उन्मेष कमलापुरे, स्वागत अध्यक्ष वीणा दुधनकर, मोनाली मुसळे तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक प्राध्यापक सत्यम दुधनकर यांनी केले. सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे यांनी केले तर आभार सुनैना धोत्रे यांनी मानले. साई समर्थ विद्या विकास संस्था ही राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना मधून समाजातील गरीब गरजू व होतकरू महिलांना गारमेंट क्षेत्रातील व इतर विविध क्षेत्रातील मोफत कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देते व त्यांना स्वावलंबी बनविण्याचे काम संस्था सात वर्षापासून करत आहे. स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी बाह्य परीक्षकांची नियुक्ती करून प्रत्येक प्रशिक्षण केंद्रातून तीन क्रमांक निवडण्यात आले. स्पर्धेत एकूण २४ महिलांना बक्षीस वितरण झाले. दीपाली दास ( शिक्षण व प्रशिक्षण क्षेत्र ) , वर्षाराणी हरिश्चंद्र मुसळे (कलाक्षेत्र), डॉ. रक्षा आरती मिलिंद गोरटे (क्रीडाक्षेत्र) यांना सन्मानित करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.