आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गोल्डन जातीच्या सीताफळाची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. मात्र यावर्षी या जातीच्या सीताफळाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने उत्पादक हिरमुसला आहे. चालू हंगाम गोल्डन सीताफळ उत्पादकासाठी निराशेचा आहे. अतिवृष्टीने झाडांना फळधारणा कमी झाली आणि दरही पडले.
गेल्या तीन-चार वर्षात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सीताफळाची विक्रमी आवक होत आहे. यामध्ये सुरुवातीला बाळनगर वाणाच्या सीताफळाची आवक सुरू होते व दिवाळीनंतर गोल्डन जातीच्या सीताफळाची आवक सुरू होते .सध्या बाजारात जवळपास दररोज तीन ते साडेतीन हजार क्रेट सीताफळाची विक्री होत आहे. यामध्ये स्थानिक सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यासह परिसरातील उस्मानाबाद ,नगर जिल्ह्यातील शेतकरीही आपली सीताफळ विक्रीसाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती घेऊन येत आहेत. आकाराने मोठ्या असलेल्या या सीताफळाला दक्षिणेतील राज्यांमधील व्यापारी खरेदी करतात.
यावर्षी अतिवृष्टीमुळे सीताफळांच्या बागामध्ये फळधारण्याची समस्या उद्भवली. कित्येक शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात फुलगळ झाली. यामुळे शेतकऱ्यांची एकरी उत्पादन घटले. मात्र गेल्या पाच सहा वर्षात विक्रमी क्षेत्रावर सीताफळाची लागवड झाली आहे. परिणामी यावर्षी बाजारात सीताफळाची आवक वाढली. याचा परिणाम दरावर दिसून येत आहे. गतवर्षीच्या तुलनेने प्रति किलो तीस ते चाळीस रुपये दर कमी असल्याची माहिती उत्पादक शेतकऱ्यांनी दिली.
योगेश फुलारी (व्यापारी, सोलापूर) म्हणाले, बंगळुरू, चेन्नईसारख्या महानगरामध्ये विक्रीसाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधून मोठ्या प्रमाणात सीताफळे पाठवली जात होती. यावर्षी ही मागणी घटली आहे. याचा परिणाम दरावर झाला आहे.
अशी आहे दराची स्थिती
गतवर्षी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नोव्हेंबर महिन्यात सरासरी २ हजार क्रेट सीताफळाची आवक होत होती यावर्षी तीच आवक ३हजार ते साडेतीन हजार क्रेट पर्यंत पोचली आहे. गतवर्षी गोल्डन सीताफळाचा दर किमान चाळीस रुपये ते कमाल १२० रुपये प्रति किलो तर सरासरी शंभर रुपये किलो इतका होता. तोच दर यावर्षी किमान ३० रुपये ते कमाल ६० रुपये सरासरी ५० रुपये प्रति किलो आहे.
यामुळे दरात घट
यावर्षी अचानक थंडी वाढल्यामुळे मागणी घटली. चार पाच वर्षांपूर्वी लागवड झालेल्या बागांमधील फळाची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. गोल्डन सीताफळाला आळीचा होत असलेला प्रादुर्भाव यामुळेही मागणी घटली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.