आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बक्षीस वितरण:सोलापूरचा लौकिक सिद्धरामेश्वरांमुळे, त्यांचे विचार अमलात आणण्याची गरज

सोलापूर7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूरचा नावलौकिक शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्यामुळे आहे. त्यांचे आचार-विचार यांचे प्रत्यक्ष जीवनात आचरण होणे गरजेचे आहे. अष्टअवरण, शटस्थल, पंचाचार, लिंगपूजा आदी गोष्टी थोतांड वाटत असल्या तरी हीच आपली संस्कृती आहे. त्याचे पालन व अवलंब व्हावा. सोलापूरचे लोक देण्यात धन्यता मानतात. आपल्या घासातील घास देणे ही सोलापूरची खासीयत आहे. दैनिक ‘दिव्य मराठी’ आणि वीरशैव व्हिजनने आयोजित केलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. यामुळे स्पर्धकांच्या तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या कलागुणांना वाव मिळाला. सोलापूर आणि सोलापूरच्या आसपासचा परिसर पाहता धार्मिक पर्यटन फार मोठ्या प्रमाणात होऊ शकते. परंतु आपण त्याचे मार्केटिंग करण्यात कमी पडत आहोत. याचे मार्केटिंग होणे खूप गरजेचे आहे. असे उपक्रम सर्व स्तरातून प्रतिवर्षी देण्यात यावेत, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.

ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेनिमित्त दैनिक ‘दिव्य मराठी’ आणि वीरशैव व्हिजनतर्फे घेण्यात आलेल्या सिद्ध सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी ते बोलत होते.

मंचावर महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे, पोलिस उपायुक्त दीपक आर्वे, समर्थ सूतगिरणीचे चेअरमन राजशेखर शिवदारे, दैनिक ‘दिव्य मराठी’चे वरिष्ठ उपसंपादक रामेश्वर विभूते, एम. के. फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनुरे, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविक वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी केले तर आभार उत्सव समिती अध्यक्ष सोमेश्वर याबाजी यांनी मानले. सूत्रसंचालन महेश कोटीवाले यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सिद्धाराम बिराजदार, नागेश बडदाळ, संजय साखरे, विजय बिराजदार, चिदानंद मुस्तारे, राजेश नीला, विजयकुमार हेले, सचिन विभूते, बसवराज जमखंडी, अमित कलशेट्टी, धानेश सावळगी, चेतन लिगाडे यांनी परिश्रम घेतले.

वीरशैव व्हिजनतर्फे घेण्यात आलेल्या सिद्ध सजावट स्पर्धेतील विजेते स्पर्धक
बक्षिसाचे स्वरूप रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र मल्लिकार्जुन जेऊरे, प्रथम, २१ हजार रु., अंजली पुजारी, द्वितीय १५हजार रु., चिन्मयी सोपल (बार्शी) तृतीय १३ हजार रु., अनिरुद्ध गवळी चतुर्थ ११ हजार रु, ऋषिकेश कमटम पाचवे १० हजार, दीपाली पाटील सहावे ९ हजार रु., श्रुती दर्गोपाटील सातवे ८ हजार रु., प्रणिता डांगे आठवे ७ हजार रु., सतीश तमशेट्टी नववे ६ हजार रु., सूरज दिंडुरे दहावे ५ हजार रु., दीपा तोटद अकरावे ४ हजार रु., राशी करोडकीकर बारावे ३ हजार रु. आणि सचिन कुलकर्णी, रवींद्र कलुरे, विजय मंगरुळे, परमेश्वर शरणार्थी, प्रवीण कदम, स्वाती केकडे, जितेंद्र नाईक, धारा वोरा या आठ स्पर्धकांना प्रत्येकी एक हजार रुपयांचे उत्तेजनार्थ बक्षिसे. तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र, सिद्धेश्वर प्रतिमा व श्यामची आई हे पुस्तक देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...