आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठ हुतात्म्यांना अभिवादन:ज्यांच्यामुळे देशात रोजगार हमी कायदा अमलात आला ; शेतकऱ्यांवर गोळीबार झाला होता

वैराग / राहुल दळवी24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

१९७१- ७२ च्या दुष्काळात हाताला काम द्या. कामाचे दाम द्या, धान्य द्या, या मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या मोर्चावर पोलिसांनी ६ सप्टेंबर १९७१ रोजी केलेल्या बेछूट गोळीबारात आठ जण हुतात्मे झाले होते. भाई सर्जेराव सगर व माजी आमदार नरसिंगराव देशमुख यांच्यासह ५४ लोक जखमी झाले होते.

गोळीबार प्रकरणानंतर सामाजिक स्थिती लक्षात घेऊन तत्कालीन महाराष्ट्र सरकारने रोजगार हमी कायदा केला आणि त्यानंतर केंद्र सरकारनेही तो रोजगार हमी कायदा संपूर्ण देशात लागू करावा लागला. तो आजवर अमलात आणला जात आहे. ५० वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेच्या स्मृती वैरागकरांनी आजही जपल्या आहेत. या हुतात्म्यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी वैराग पोलिस ठाण्यासमोर तलाठी कार्यालयाच्या शेजारी एक स्मृती स्तंभ उभा केला आहे. दरवर्षी ६ सप्टेंबर रोजी तालुक्यातील शेतकरी शेतमजूर एकत्रित येतात. वैराग, ता. बार्शी येथील खंडोबा वेसीपासून मुख्य गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून हा मूक मोर्चा काढून हुतात्मा स्तंभाला पुष्पचक्र वाहतात. ही परंपरा ५० वर्षांपासून चालू आहे.

सन १९७२ साली शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने दिवंगत माजी आमदार कै. चंद्रकांत नाना निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा मोर्चा ६ सप्टेंबर रोजी शासकीय गोदामावर काढण्यात आला होता. माजी आमदार भाई कै. चंद्रकांत नाना निंबाळकर, भाई सर्जेराव सगर, माजी आमदार नरसिंगराव देशमुख, भाई ज्ञानेश्वर पाटील, शाहीर विश्वासराव फाटे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले होते. मोर्चेकरी शांतपणे कलेक्टर येण्याची वाट पहात होते. मोर्चासमोर जिल्हाधिकारी येणार नाहीत असे समजल्यानंतर नेतेमंडळीनी सत्त्याग्रहींच्या तुकड्या करून धरणे धरण्याचा निर्णय घेतला. तत्कालीन पोलिस अधिकारी डेमला यांनी मोर्चेकऱ्यावर लाठीहल्ला करीत अश्रुधुराचा मारा करून बेछूट गोळीबार केला. अनेकांना पोलिसांनी पकडून बेदम मारहाण केली. झालेल्या या गोळीबारात आठ जण मरण पावले तर ५४ जण जबर जखमी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...