आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भूकंप:सातारा जिल्हा भूकंपाने हादरला, रात्री दीड वाजेच्या सुमारास कोयना परिसरात जाणवले धक्के; नागिरकांमध्ये भीतीचे वातावरण

सातारा7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या भूकंपामुळे कोयना धरणाला कोणताही धोका नसल्याचे सांगण्यात आले आहे

साताऱ्यातील कोयना परिसरात 2.6 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के जाणवले. रात्री दीड वाजेच्या सुमारास कोयना परिसरातील पाटण आणि कोकण किनारपट्टीच्या परिसर हादरला. या भूकंपामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वारणा खोऱ्यातील चांदोली गावच्या पश्चिमेला 6 किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे म्हटले जात आहे. 

भूकंपामुळे कोयना धरणाला धोका नाही

कोयना धरण परिसरात नेहमीच भूकंपाचे धक्के जाणवत असतात. 24 जून रोजी वारणा खोऱ्यात 2.3 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. या भूकंपामुळे कोयना धरणाला कोणताही धोका नसल्याचे सांगितले आहे. दरम्यान नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser