आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • East Division Central's Immersion Processions Will Be Dolby free This Year; Emphasis On Constructive Activities Throughout The Year | Marathi News

सुखद:पूर्व विभाग मध्यवर्तीच्या विसर्जन मिरवणुका यंदा असतील डाॅल्बीमुक्त ; वर्षभर विधायक उपक्रमांवर भर

साेलापूर / श्रीनिवास दासरीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्व विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशाेत्सव मंडळाची विसर्जन मिरवणूक यंदा डाॅल्बीमुक्त असणार आहे. सहभागी मंडळे डाॅल्बी घेऊन येणार नाहीत, तशा सूचना केल्या. त्याला चांगला प्रतिसाद असल्याचे अध्यक्ष संजय साळुंके म्हणाले. यंदाच्या मिरवणुकीत ३६ सार्वजनिक मंडळे सहभागी हाेतील. पारंपरिक वाद्यांमध्ये ढाेल-ताशा, झांज असेल. शक्तिप्रयाेगही असतील. मर्दानी लेझीम पथके कला सादर करतील. विशेष म्हणजे समाज प्रबाेधनासाठी सामाजिक आशयांची पथनाट्ये हाेतील, असेही श्री. साळुंके यांनी सांगितले. गेली दाेन वर्षे मिरवणुका नसल्याने यंदा मंडळांनी जाेरदार तयारी सुरू केली. यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे लेझीम. त्यामुळे तरुणाई एकवटली आहे.

४० वर्षांपूर्वी स्थापन झाले तेलुगु भाषिकांचे मध्यवर्ती : शहरात सार्वजनिक आणि लाेकमान्य अशी दाेन मध्यवर्ती मंडळे हाेती. पूर्वभागातील मंडळांच्या मिरवणुका त्यात सहभागी व्हायच्या. १९८३ मध्ये पूर्व विभाग मध्यवर्तीची स्थापना झाली. माजी महापाैर जनार्दन कारमपुरी यांच्यासह मान्यवर मंडळींनी त्यासाठी पुढाकार घेतला. मिरवणूक मार्ग ठरवून श्री सिद्धेश्वर तलावातील विष्णू घाट येथेच मूर्ती विसर्जित करण्याचे ठिकाणही ठरवले. या मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक वाद्ये आणि भजन. अलीकडेच डाॅल्बीचा दणदणाट सुरू झाला. यंदा मात्र त्याला प्रतिबंध करून उत्सवाला विधायक रूप देण्याचा प्रयत्न पदाधिकाऱ्यांनी सुरू केला आहे.

सहभागी मंडळांकडून आहे चांगला प्रतिसाद
डाॅल्बीमुक्त मिरवणुकीचा संदेश घेऊन विसर्जन मिरवणुकीत सहभागी हाेणाऱ्या मंडळांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आहे. बहुतांश मंडळांची लेझीम पथके आहेत. सामाजिक संदेश देण्यासाठी पथनाट्ये सादर करण्याच्या सूचनाही केल्या. ''
संजय साळुंके, अध्यक्ष, पूर्व विभाग मध्यवर्ती मंडळ

बातम्या आणखी आहेत...