आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नमामि चंद्रभागा पोहोचली लोकसभेत:खासदार खा. रणजितसिंह निंबाळकर यांनी प्रदुषणाबाबत केली मागणी

सांगोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुळा-मुठा नदी राज्यातील सर्वात जास्त प्रदूषित आहे. या नदीचे पाणी उजनी धरणात सोडले जात असल्याने उजनी धरणातील पाणी जास्त प्रदूषित झाले आहे.उजनी धरणातील पाण्याचा वापर सोलापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नमामि चंद्रभागा परियोजनेची अंमलबजावणी करण्याची मागणी केली, असे खा. रणजितसिंह निंबाळकर यांनी लोकसभेत केली.

पुणे जिल्ह्यातील मुळा-मुठा नदीच्या काठावर अनेक औद्योगिक वसाहती असल्याने कारखान्यातील रासायनिक सांडपाण्याचा प्रवाह थेट नदीपात्रात येत असल्याने दुर्गंधी पसरत आहे. अनेक उद्योगंचे केमिकलमिश्रीत पाणी नदीत सोडले जाते. त्यामुळे नदी प्रदूषण मोठी डोकेदुखी बनले आहे. प्रदूषित पाणी चंद्रभागा नदीतून येत असल्याने लाखो नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. प्रदूषित पाणी थेट चंद्रभागा नदीत तसेच उजनी धरणात येत असल्याने धरणातील पाणी प्रदूषित झाले असून पाण्यावर तेलाचा तवंग निर्माण झाला आहे. दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक पंढरपुरात येऊन चंद्रभागा नदीत स्नान करीत असतात. उजनी धरणाचे पाणी सोलापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी वापरले जात आहे. प्रदूषित पाणी चंद्रभागा नदीतून येत असल्याने लाखो नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.

प्रदूषित झालेल्या चंद्रभागा नदी व उजनी धरणाची दखल खा. निंबाळकर यांनी घेतली अाहे. त्यांनी लोकसभेत यावर आवाज उठवला आहे. केंद्र सरकारच्या नमामि चंद्रभागा परियोजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे श्री. निंबाळकर यांनी सांगितले आहे. यासाठी केंद्र शासनाने नमामि चंद्रभागा या योजनेतून चंद्रभागा नदीत थेट येणाऱ्या पाण्याचे शुध्दीकरण करून ते पाणी नदीत सोडण्याची मागणी त्यानी केली.

बातम्या आणखी आहेत...