आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. जगन्नाथ दीक्षितांचा पोलिसांना सल्ला:कडक भूक लागली की दोनदा जेवण करा, रोज 4.5  किमी चाला

सोलापूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेव्हा आपल्याला कडक भूक लागल्याची जाणीव होते तेव्हा दिवसातून दोन वेळा जेवण करा. ते जेवण ५५ मिनिटांत संपवा. मधुमेही व्यक्तींनी गोड खाऊ नये, दररोज साडेचार किमी चालण्याचा व्यायाम करा आणि सुखी आणि आनंदी जीवन जगा, असा मूलमंत्र आहारतज्ज्ञ डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांनी बुधवारी पोलिसांना दिला.

सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षक यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ज्यांना मधुमेह नाही त्यांनी जेवणाआधी ड्रायफूट, काकडी, टोमॅटो, सालाडनंतर मोड आलेले कडधान्य खावे. ज्यांना मधुमेह आहे अशा लोकांनी गोड पदार्थ टाळावे, वारंवार खाऊ नका, व्यायाम करा. पाणी, ताक, ग्रीन टी घ्या, असा सल्लाही त्यांनी या वेळी दिला.

बातम्या आणखी आहेत...