आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरमध्ये ईडीकडून चौकशी:राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे आणि रणजितसिंह शिंदे यांची ईडीकडून चौकशी; चौकशीमुळे माढ्यात खळबळ

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माढा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे आणि रणजितसिंह शिंदे यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. साखर कारखान्यातील शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज उचलण्यासोबतच अन्य प्रकरणांमध्ये ईडीकडून ही चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रकरण जवळपास 500 कोटींच्या जवळपास जात असल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांच्या पाठिमागे ईडी कारवाईचा ससेमिरा लागला आहे. तो काही केल्या थांबायचे नाव घेत नाहीये. मुंबई, पुणे, यासह आता ग्रामीण भागातही ईडीच्या कारवाया सुरू झाल्या आहेत. शिंदे पिता-पुत्राची तील वेळेस चौकशी झाली असल्याची माहिती आहे. साखर कारखान्यातील शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज काढणे, शेतकऱ्यांच्या नावावर उचललेले कर्ज कर्जमाफीत माफ करणे, गिरणी खरेदी यासह विविध विषयात ईडीकडून तीन वेळा चौकशी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यात सहकार क्षेत्रात आमदार बबनराव शिंदे मोठे वजन देखील आहे.

शिवसेना नेत्याकडून शिंदे विरोधात तक्रार दाखल
शिवसेनेचे नेते संजय कोकाटे आणि नागनाथ कदम यांनी शिंदे यांच्या विरोधात ईडीकडे तक्रार केली होती. शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा मिळवून देण्यासाठी वेळ प्रसंगी हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात जाऊ, असे वक्तव्य कोकाटे यांनी केले आहे. मविआतील मित्र पक्षाच्या आमदाराची तक्रार शिवसेनेच्या नेत्याने केल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहे.

ईडीशिवाय आता एक दिवस जात नाही!

एकीकडे महाविकास आघाडीतील नेत्यांविरोधात ईडीचे धाडसत्र सुरू असताना राज्य सरकारकडून मात्र भाजप नेत्यांविरोधात कारवाया केल्या जात नाही. यामुळे मुख्यमंत्री नाराज असल्याच्या चर्चांबाबत शरद पवार म्हणाले, सत्तेचा गैरवापर करावा, अशा संस्कारात आम्ही वाढलो नाही. आता ईडीच्या धाडींवरून आम्हाला काहीही आश्चर्य वाटत नाही. मात्र, राजकीय विरोधकांना संपुष्टात आणण्यासाठी तपास यंत्रणांचा असा वापर यापुर्वी कधीही झालेला नाही. दहा वर्षांपुर्वी ईडी कोणाला माहितही नव्हती. मात्र, आज ईडीशिवाय एक दिवस जात नाही. लोकांना सत्तेचा असा गैरवापर आवडत नाही. ते मतदान पेटीतून धडा शिकवतील, असा इशारा शरद पवार यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...