आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयोजन:‘दिव्य मराठी’ तर्फे 17 ते 19 जूनपर्यंत एज्युकेशन अॅण्ड करिअर फेअरचे आयोजन

सोलापूर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दैनिक ‘दिव्य मराठी’तर्फे शुक्रवार, दि. १७ ते रविवार १९ जून या कालावधीत ‘दिव्य एज्युकेशन अॅन्ड करिअर फेअर २०२२’ या शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ड्रीम पॅलेस, सेवासदन शाळेसमोर, जुनी पोलिस कल्याण केंद्र या ठिकाणी होणाऱ्या या प्रदर्शनात शिक्षण क्षेत्रातील विविध पर्यायासोबतच विविध विषयांवरील सेमीनारही प्रदर्शनाचे असणार आहे. कोरोनाच्या निर्बंधामुळेे सर्वच क्षेत्राप्रमाणे शिक्षण क्षेत्रावरही विपरीत परिणाम झाला होता. आता निर्बंध दूर झाल्याने शिक्षण क्षेत्रानेही मरगळ झटकली असून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या नवनवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. या शैक्षणिक संधीची विद्यार्थी व पालकांना माहिती व्हावी याच उद्देशाने दिव्य मराठीतर्फे एज्युकेशन अॅन्ड करिअर फेअरचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार १७ जून ते रविवार १९ जून या कालावधीत दिव्य एज्युकेशन अॅन्ड करिअर फेअर २०२२ या शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी या प्रदर्शनाचे आयोजन दिव्य मराठीतर्फे करण्यात येते. यामध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यातील नामांकित शिक्षण संस्थांचा सहभाग असतो. शिक्षण क्षेत्रातील विविध पर्यायासोबतच विविध विषयांवरील सेमीनार हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. शैक्षणिक हबच्या दिशेने सोलापूरची वाटचाल सुरू असून अशावेळी दिव्य मराठीतर्फे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रदर्शनात विद्यार्थी व पालकांना एकाच छताखाली विविध शैक्षणिक संस्थांच्या स्टॉलला भेट देता येईल. प्रदर्शनात शहरातील विविध शैक्षणिक संस्थांचा सहभाग असून दहावी व बारावी नंतरच्या करिअरच्या संधीची माहिती मिळू शकेल. स्पर्धा परीक्षा, इंजिनिअरिंग, विद्यार्थ्यांना दहावी व मेडिकल, आय.टी. संस्था, इंटील मॅनेजमेंट, एमबीए, पॉलिटेक्निक, फॅशन व इंटेरिअर डिझायनिंग, शिक्षणशास्त्र, अॅनिमेशन, कोचिंग क्लासेससह विविध माहिती उपलब्ध होणार आहे. प्रदर्शनाला नक्की भेट द्यावी अधिक माहितीसाठी ९७६५५६२८७० या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...