आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना 25 हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते त्यांचे आज शिक्षण विभागाने निलंबन केले.
25000 रूपयांची लाच घेताना प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ किरण लोहार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. दिनांक 3 नोव्हेंबर रोजी लाचलुचपत विभागाकडून अहवाल प्राप्त होताच तातडीने जिल्हा परिषद प्रशासनाने अवर सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मुंबई, आयुक्त शिक्षण विभाग पुणे व संचालक शिक्षण विभाग पुणे या कार्यालयांना शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावर पुढील प्रशासकीय कारवाईसाठी अहवाल पाठवला होता.
त्यानुसार राज्य शासनाकडून आज दिनांक 7 नोव्हेंबर रोजी क्र. निलंब २०२२/प्र.क्र.२५३/प्रशा-३ शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. दिनांक ७ नोव्हेंबर २०२२ या आदेशानुसार शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना निलंबित करण्यात आले आहे.
निलंबन आदेशानुसार किरण लोहार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) (गट-अ), जि.प.सोलापूर यांना अटकेच्या दिनांकापासून निलंबित करण्यात आले आहे आणि पुढील आदेश होईपर्यंत ते निलंबित राहतील. त्याचप्रमाणे निलंबन कालावधीत लोहार यांचे मुख्यालय सोलापूर ठेवण्यात आले असून त्यांना या कालावधीत मुख्यालय सोडता येणार नाही असेही निलंबन आदेशात नमूद करण्यात आले आहे.
शिक्षणाधिकारी लोहार यांनी सोलापूर प्राथमिक शिक्षण विभागाचा कारभार पाहताना रक्कम दिल्याशिवाय फाईल मंजूर न करण्याचा सपाटा लावला होता दरम्यान एका खाजगी संस्था चालकाने शाळेच्या वर्ग तुकड्याची मान्यता साठी प्रस्ताव सादर केला असता त्या संस्थाचालकास मान्यतेसाठी रक्कम मागण्यात आली होती याबाबतची तक्रार संस्था चालकाने लाचलुचपत विभागाकडे केली असता लाचलचपत विभागाने सापळा रचून शिक्षणाधिकारी लोहार यांना रंगेहात पकडले दरम्यान तीन दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.