आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:शिक्षणाधिकारी लोहार यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोंडी येथील एका शाळेतील आठवी ते दहावीचे वर्ग वाढवण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी मंगळवारी सुनावली. सोमवारी (दि. ३१) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली होती.

यामध्ये सरकारतर्फे अॅड. गंगाधर रामपूरे, आरोपीतर्फे अॅड. मिलिंद थोबडे या वकिलांनी काम पाहिले. दरम्यान, याबाबत बोलताना उप अधीक्षक संजीव पाटील म्हणाले, “लोहार यांच्या मालमत्तेची व अन्य बाबींची चौकशी करण्यात येणार आहे. त्यांचे कोल्हापूर (शिक्षक वसाहत) येथे असून त्या ठिकाणी मंगळवारी तपासाणी झालेली नाही. पण, येत्या दोन-तीन दिवसांमध्ये तपासणी होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.

बातम्या आणखी आहेत...