आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:शिक्षणाधिकारी लोहार निलंबित‎

सोलापूर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार‎ यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात‎ आली आहे. निलंबन आदेशानुसार लोहार‎ यांना अटकेच्या दिनांकापासून निलंबित‎ करण्यात आले आहे. पुढील आदेश होईपर्यंत‎ ते निलंबित राहतील. त्याचप्रमाणे निलंबन ‎कालावधीत लोहार यांचे मुख्यालय सोलापूर ‎ ‎ठेवण्यात आले असून त्यांना या कालावधीत मुख्यालय सोडता येणार नाही, असेही‎ आदेशात नमूद आहे.‎ प्राथमिक शिक्षणाधिकारी लोहार यांना ‎ ‎ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २५‎ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते.‎

३ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत विभागाकडून ‎ अहवाल प्राप्त होताच तातडीने जिल्हा परिषद ‎ ‎ प्रशासनाने अवर सचिव शालेय शिक्षण व‎ क्रीडा विभाग मुंबई, आयुक्त शिक्षण विभाग‎ पुणे व संचालक शिक्षण विभाग पुणे या‎ कार्यालयांना शिक्षणाधिकारी किरण लोहार‎ यांच्यावर पुढील प्रशासकीय कारवाईसाठी‎ अहवाल पाठवला होता. मात्र त्याच्यावर‎ लगेच निलंबनाची कारवाई होणे अपेक्षित‎ होते. मात्र दोन दिवस सुटी आल्याने कारवाई‎ होण्यास विलंबच लागला आहे. अहवाल‎ प्राप्त होताचा शासनाकडून शिक्षणाधिकारी‎ किरण लोहार यांना निलंबित करण्यात आले‎ आहे.‎

लोहारला जिल्हा व सत्र‎ न्यायालयाकडून जामीन
लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहार याला‎ जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे‎ यांनी वीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर‎ जामीन मंजूर केला. जामीन अर्ज सुनावणीच्या‎ वेळेस अर्जदार आरोपीचे वकील अॅड.‎ मिलिंद थोबडे यांनी युक्तिवाद केला. गुन्ह्याचा‎ तपास पूर्णत्वास आला आहे, साक्षीदारावर‎ दबाव आणण्याचा कोणताही प्रश्न येत नाही,‎ आरोपी हा कोठेही पळून जाणार नाही, असा‎ युक्तिवाद अॅड. थाेबडे यांनी केला. तो ग्राह्य‎ धरून न्या. पांढरे यांनी वीस हजार रुपयांच्या‎ जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.‎ सरकारतर्फे अॅड. शैलजा क्यातम यांनी तर‎ आरोपीतर्फे अॅड. मिलिंद थोबडे, अॅड. विनोद‎ सूर्यवंशी यांनी काम पाहिले.‎

बातम्या आणखी आहेत...