आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवाजीराव मोरे महाराज‎ देहुकर यांचे मत‎:समतेच्या वारीतून जातीय‎ संघर्ष नष्ट करण्याचा प्रयत्न‎

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संत चोखामेळा अध्यासन केंद्र च्या वतीने चोखोबा ते तुकोबा एक वारी समतेची ही वारी नऊ जिल्ह्यातून फिरणार असून या वारीच्या माध्यमातून संतांचा संदेश देत समाजातील जातीय विद्वेष आणि संघर्ष नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात असल्या चे मत तुकोबा महाराजांचे दहावे वंशज शिवाजीराव मोरे महाराज देहुकर यांनी सांगितले.

ही वारी एक जानेवारी रोजी मंगळवेढा येथून प्रस्थान झाली, दोन जानेवारी रोजी या वारीचे सोलापुरात आगमन झाले. ही वारी दुपारी तीन वाजता सिंहगड महाविद्यालयात पोहोचली. सायंकाळी बाळीवेस येथील मारुती मंदिर येथे आगमन झाले. या मंदिरात वारी येतात सोलापुरातील भक्तांनी पुष्पवृष्टी केली, महाआरती करीत वारीचे स्वागत केले. वारी मंदिरात पोहोचल्यानंतर वारीचे महत्व सांगण्यात आले. यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, माजी नगरसेवक विनायक विटकर, माजी नगरसेविका नरसूबाई गदवालकर, सुशील बंदपट्टे यांची प्रमुख उपस्थिती होती. समारोप होतात सर्व भक्तांनी महाराजांचे आशीर्वाद घेतले.

बातम्या आणखी आहेत...