आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मत‎:समतेच्या वारीतून जातीय‎ संघर्ष नष्ट करण्याचा प्रयत्न‎

सोलापूर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संत चोखामेळा अध्यासन केंद्र च्या‎ वतीने चोखोबा ते तुकोबा एक वारी‎ समतेची ही वारी नऊ जिल्ह्यातून‎ फिरणार असून या वारीच्या माध्यमातून‎ संतांचा संदेश देत समाजातील जातीय‎ विद्वेष आणि संघर्ष नष्ट करण्याचा‎ प्रयत्न केला जात असल्या चे मत‎ तुकोबा महाराजांचे दहावे वंशज‎ शिवाजीराव मोरे महाराज देहुकर यांनी‎ सांगितले.‎ ही वारी एक जानेवारी रोजी‎ मंगळवेढा येथून प्रस्थान झाली, दोन‎ जानेवारी रोजी या वारीचे सोलापुरात‎ आगमन झाले. ही वारी दुपारी तीन‎ वाजता सिंहगड महाविद्यालयात‎ पोहोचली.

सायंकाळी बाळीवेस येथील‎ मारुती मंदिर येथे आगमन झाले. या‎ मंदिरात वारी येतात सोलापुरातील‎ भक्तांनी पुष्पवृष्टी केली, महाआरती‎ करीत वारीचे स्वागत केले. वारी‎ मंदिरात पोहोचल्यानंतर वारीचे महत्व‎ सांगण्यात आले. यावेळी आमदार‎ विजयकुमार देशमुख, माजी नगरसेवक‎ विनायक विटकर, माजी नगरसेविका‎ नरसूबाई गदवालकर, सुशील बंदपट्टे‎ यांची प्रमुख उपस्थिती होती. समारोप‎ होतात सर्व भक्तांनी महाराजांचे‎ आशीर्वाद घेतले.‎

बातम्या आणखी आहेत...