आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पुणे सोलापूर महामार्गावरील वरवडे टोलनाक्यावर कर्तव्य बजावत असलेल्या वाहतुक पोलिसांच्या अंगावर मद्यधुंद टेम्पो चालकाने टेम्पो घातल्याने पोलिसाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना साडे पाचच्या सुमारास घडली आहे. सागर औदुबर चोबे (वय 34) असे त्या मृत झालेल्या टेभुर्णी पोलिस ठाण्यातील वाहतुक पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी नागनाथ शिवाजी गुटे (रा.परळी वैजनाथ) या टेम्पो चालकास टेभुर्णी पोलिसांनी ताब्यात घेतल आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेडिसीनचे साहित्य घेऊन हैद्राबादहुन पुण्याकडे आयशर टेम्पो(क्र.एमएच.04. एचडी. 0170)चालला होता.दरम्यान, वरवडे टोलनाक्याजवळ बंदोबस्तास थांबलेल्या वाहतुक पोलिस चोबे यांनी टेम्पो चालकाला थांबवण्याचा इशारा केला. मात्र टेम्पो दारु पिऊन तराट स्थितीत असलेल्या टेम्पो चालकाने थेट चोबे याच्या अंगावर थेट टेम्पो घातला. यात चोबे यांच्या जागीच मृत्यू झाला.
अपघात होताच टेम्पो चालक पळुन चालला होता दरम्यान अपघात घडलेल्या ठिकाणीच उपस्थित असलेल्या वैभव गायकवाड,स्वप्नील तळेकर,गणेश गायकवाड,उमेश भोसले आदी तरुणांनी चालकाला पकडले. तसेच, चोबे यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवून माणुसकीचे दर्शन घडवले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.