आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:45 लाखांची रोकड शोधण्यास आठ पथके‎

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎वाहन शोरूम मालकाचे दक्षिण कसबा‎ येथील घर चोरांनी फोडले होते. तब्बल‎ ४५ लाख रुपयांची रोकड चोरून नेली‎ होती. या प्रकरणाच्या तपासासाठी‎ पोलिसांना आठ पथके नेमली आहेत. ही‎ पथके शहराच्या बाहेर विविध दिशेने‎ रवाना करण्यात आल्याची माहिती शहर‎ पोलिसांनी दिली. पथकांत गुन्हे शाखेचे‎ सहा आणि फौजदार चावडी पोलिस‎ ठाण्याच्या दोन पथकांचा समावेश आहे.‎

चोरांनी आशिष पाटोदेकर यांच्या‎ घराचे मुख्य गेट व दरवाजाचे कुलूप‎ बनावट चावीने उघडून प्रवेश करत चोरी‎ केली होती. ते कुटुंबासह पुण्याला गेले‎ होते. ते घरी आल्यानंतर हा चोरीचा‎ प्रकार त्यांच्या लक्षात आला. चाेराने‎ बनावट चावीच्या आधारे घरात प्रवेश‎ केला आणि दागिने सोडून रोकड नेली.‎

बातम्या आणखी आहेत...