आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिनविरोध‎:सहकारी ग्राहक भांडारची निवडणूक बिनविरोध‎

साेलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या ४८ वर्षांत एकदाही‎ निवडणूक लागली नाही‎ प्रतिनिधी | साेलापूर‎ माॅल संस्कृती कुणाला माहीत नसल्याच्या ‎काळात साेलापूर जिल्हा मध्यवर्ती‎ सहकारी ग्राहक भांडारची स्थापना झाली. ‎त्याला ४८ वर्षे हाेत आहेत. या कालावधीत ‎ एकदाही निवडणूक झाली नाही. यंदाची ‎पंचवार्षिक निवडणूकही बिनविराेध करून ‎ ‎ सभासदांनी परंपरा कायम ठेवली.‎

सहकारमहर्षी, माजी आमदार कै. वि.‎ गु. शिवदारे आणि त्यांचे सहकारी कै.‎ शिवलिंग दुधनी यांनी ४८ वर्षांपूर्वी पहिले‎ सहकारी ग्राहक भांडार सुरू केले. ते‎ साेलापूरचे पहिले अन्नधान्याचे माॅल‎ ‎ म्हणता येईल. कै. शिवदारे यांच्या पश्चात‎ त्यांचे चिरंजीव राजशेखर शिवदारे‎ यांच्याकडे संस्थेची धुरा आली.‎ सहकारी संस्थांच्या शहर उपनिबंधक‎ वैशाली साळवे यांनी संस्थेच्या ११‎ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर‎ केला हाेता. चंद्रकांत गुरव, महेश अंदेली,‎ महादेव बिराजदार, प्रभाकर हंजगे, संगण्णा‎ वाघमारे, भारती कटारे, राजश्री बरबडे,‎ अॅड. बाबू पाटील, सिद्धाराम अण्णाप्पा‎ जाेडभावी, रमेश बसाटे आणि शिवाजी‎ कांबळे यांचेच अर्ज आले.‎

बातम्या आणखी आहेत...