आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुका:कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुका; कुरघोट, शिंगडगाव सोसायटीवर हसापुरे गट

दक्षिण सोलापूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुरघोट व शिंगडगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत जिल्हा बँकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे यांच्या गटाने एकतर्फी विजय मिळवला. दोन्ही सोसायटीच्या नूतन संचालकांचा हसापुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिंगडगावमध्ये श्री धुळीमहांकाळेश्वर शेतकरी विकास परिवर्तन पॅनलने मल्लिकार्जुन पनशेट्टी व महादेव कोरे यांच्या नेतृत्वाखाली विजय मिळवला. सत्ताधाऱ्यांची ४० वर्षांची सत्ता उलथवून लावत पनशेट्टी गटाने बाजी मारली.

१३ पैकी ११ जागा या गटाने जिंकल्या तर विरोधी गटाला केवळ दोन जागा मिळाल्या. विजयी उमेदवार असे, सर्वसाधारण मतदारसंघातून मल्लाप्पा म्‍हेत्रे, चंद्रकांत मोरे, शिवशरण नायकोडे, लक्ष्मीकांत पनशेट्टी, मल्लीकर्जून पनशेट्टी, रामचंद्र सातपुते कुलपा अचलेरे, गुराण्णा बडुरे, इतर मागास प्रवर्ग मतदारसंघातून रेवणसिद्ध म्हेत्रे, महिला मतदारसंघातून सुनीता कोळी व अंबव्वा कोरे, अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून संजय थोरात व विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघातून मल्लिकार्जुन मोफरे.कुरघोट विविध कार्याकारी सोसायटीच्या निवडणुकीत सुरेश हसापुरे गटाने १३ पैकी १३ जागा जिंकून पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.

विजयी उमेदवार असे-बनसिध्द बन्ने, विठ्ठल आटकर, गुरुशांत बन्ने, दौला नदाफ, निलप्पा व्हनमाने, शंकर कोळी, रेवप्पा घोडके, रेवप्पा क. घोडके तर बिनविरोध संचालकपदी शालूबाई दुधभाते, रजिया शेख, परसप्पा रगटे, रेवणप्पा व्हनमाने व अन्वर पटेल यांची निवड झाली.या निवडणुकीत बिरेश्वर सातोपीर विकास पॅनलने मलकप्पा व्हनमाने, जगदेव आटकर, श्रीशैल काळे, पंडित बनसोडे, जहीर पटेल, तायना घोडके, आमसिद्ध घोडके, जगदेव आटकर, जाहिद पटेल व इतर कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली विजय मिळवला. या वेळी बोलताना माजी सरपंच व नूतन संचालक बनसिध्द बन्ने म्हणाले, शेतकरी सभासदांनी आमच्या पॅनलवर विश्वास ठेवून मतदान केले. बहुमतांनी आम्हाला निवडून दिले. नवीन सभासद करून सर्व शेतकरी व सभासदांना कर्ज वाटप करणार आहोत.

बातम्या आणखी आहेत...