आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय:खासगीकरणाच्या विरोधात वीज कामगार शनिवारपासून संपावर

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अदानी इलेक्ट्रिक कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज निर्माण आयोगाकडे समांतर परवान्यासाठी नफा मिळविण्याच्या उद्देशाने अर्ज केलेला आहे. या खासगीकरणाच्या विरोधात सर्व संघटनांनी एकत्र येऊन तिन्ही वीज कंपन्यांचे सुमारे ८६ हजार वीज कामगार ४ जानेवारीपासून ७२ तासांच्या संपावर जाणार असल्याची माहिती, एमएसईबी वर्कर्स फेडरेशनचे विलास कोले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

काेट्यवधी रुपये खर्च करून शासन वीज ग्राहकांना विद्युतपुरवठा करत आहे. वीज ग्राहकांना देण्यात येणारे विजेचा दर विशेष करून शेती पंप, दारिद्र्य रेषेखालील ग्राहक शंभर युनिटच्या आतील वापर असलेले ग्राहक, सार्वजनिक पथदिवे य पाणीपुरवठा, सरकारी कार्यालये असतील इत्यादींना वीज खरेदी दरापेक्षा कमी दराने वीजपुरवठा करण्यात येतो. महावितरण कंपनीला वार्षिक ८५ हजार कोटी महसूल मिळत आहे. त्यामध्ये हजारो कोटींचा वाटा हा सबसिडीचा आहे. खासगीकरण झाल्यास उर्वरित वीज ग्राहकास वीज दरवाढीचा मोठा फटका बसू शकतो.

याकरिता वीज उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच संघटनांनी एकत्र येऊन त्यास विरोध म्हणून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी गौरेश पाटील, विजयकुमार राकले, नितीन चव्हाण, पी.एल. जाधव, गोपाळ बार्शीकर, युवराज यलगुलवार, नीलेश वरखडे, राजेंद्र निकम, शशिकांत बनसोडे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...