आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्ता खुला:आपत्कालीन रस्ता खुला होणार, उद्या 312 स्टाॅलचे फेर लिलाव

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

होम मैदानलगतचा हरिभाई देवकरण प्रशाला ते मार्केट पोलिस चौकीपर्यंतचा वाहतुकीसाठी बंद ठेवलेला रस्ता महापालिका लवकरच खुला करणार आहे. तसेच या रस्त्यावरील स्ट्रीट बाजारच्या स्टाॅलचा फेर लिलाव गुरुवारी केला जाणार असल्याचे महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले.

आपत्कालीन रस्ता म्हणून महसूल विभागाने हा रस्ता विकसित केला हाेता. त्यानंतर स्मार्ट सिटी निधीमधून परिसर विकसित झाला. तेव्हापासून तेथे बॅरिकेटिंग लावण्यात आले. स्टाॅल व रस्ता बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत होते. तेथे स्टाॅल सुरू होईपर्यंत तो रस्ता सुरू करण्यात येणार आहे. तेथे असलेल्या ३२ स्टाॅल भाडेतत्त्वावर विक्रेत्यांना देण्यासाठी पाच वेळा लिलाव झाले. परंतु अद्याप प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. आता आॅनलाइन लिलाव प्रक्रिया करण्यात येत आहे. ३२ स्टाॅलमध्ये खाद्य, इमिटेशन व ज्वेलरी, बंद खाद्यपदार्थ, गारमेंटच व्यवसायाचा समावेश आहे. दिव्यागांना स्टाॅल देण्यात येणार आहे. तेथे भौतिक सुविधा महापालिका उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...