आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी कारखान्याची सभा साखर उत्पादनाबरोबरच कारखान्यांनी उपपदार्थ निर्मितीवर भर देणे काळाची गरज आहे. सहकारमहर्षी कारखाना उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करणार असल्याचे संकेत दिले. सदर वर्षी कारखान्याने १४ लाख टन उसाचे गाळपाचे उद्दिष्ट ठेवल्याचे कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते यांनी सांगितले.
कारखान्याची ६२ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन जयसिंह मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते, अकलूज बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते, आमदार रणजितसिंह मोहिते, स्वरूपाराणी मोहिते, अर्जुनसिंह मोहिते, विश्वतेजसिंह मोहिते, उपाध्यक्ष अॅड. प्रकाशराव पाटील आदी उपस्थित होते. कारखान्याने मागील काही दहा वर्षात नऊ वेळा जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा, तर दोन वेळा राज्यात द्वितीय क्रमांकाचा दर देऊन उच्चांक केला असल्याचे त्यांनी सांगितले.
सभासदांनी ठरावांना एकमताने मंजुरी दिली. जास्त उत्पादन घेतलेले दीपक जाधव वाघोली यांना प्रथम क्रमांकाचे रुपये १५ हजार, द्वितीय ज्ञानदेव घोगरे बावडा रुपये १० हजार आणि खोडवा उत्पादनात बाबा पवार बिजवडी रुपये १५ हजार यांना सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन गौरवण्यात आले. कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले, कर्मचारी गजानन पिसे, नितीन बेनकर यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सत्कार करण्यात आला.
साखर कारखान्याच्या सभेत बोलताना चेअरमन जयसिंह मोहिते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.