आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा दिवसांत वाटप:पालिका स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांना मिळणार रेनकोट

सोलापूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळ्यात संसर्गजन्य रोगास प्रतिबंध करण्यासाठी स्वच्छता महत्त्वाची आहे. पावसामुळे स्वच्छतेत बाधा येऊ नये म्हणून घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील बदली, रोजंदारी, झाडूवाले, गटार बिगारी, सफाई कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या वतीने रेनकोट देण्यात येणार आहे. महापालिकने रेनकोट मागवले असून, पुढील दहा दिवसांत वाटप करण्यात येणार आहे.

सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट मिळावेत म्हणून सोलापूर महानगरपालिका महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे मागणी केली हाेती. यासाठी कामगार संघटनेचे सायमन गट्टू, बापू सदाफुले यांनी मागणी केली होती. त्यानुसार रेनकोट मागवण्यात आले आहेत. याबाबत मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांनी कामगार संघटनांना बोलवून रेनकोट आल्याची माहिती दिली.

रोजंदारी कर्मचाऱ्यांना पहिल्यांदाच रेनकोट मिळत असल्याचे सांगण्यात आले. हजार कर्मचाऱ्यांना रेनकोट देण्याचे नियोजन आहे. यामुळे पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजार पसरवण्यापासून प्रतिबंध करता येईल. महापालिका सफाई कर्मचाऱ्यांना पावसापासून सरंक्षण मिळेल, असे कामगार संघटनेचे बापू सदाफुले यांनी सांगतिले.

बातम्या आणखी आहेत...