आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन:बेरोजगारांसाठी २९ व ३० ला रोजगार मेळावा

साेलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर यांच्यामार्फत २९ आणि ३० ऑगस्ट रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टिने ऑनलाइन मेळावा असल्याची माहिती सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी दिली.

रोजगार मेळाव्यात १० वी, १२ वी, ट्रेनी, आय.टी.आय. टर्नर, सीएनसी ऑपरेटर, मशिनिस्ट, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, बी.एस.सी., एमएससी, एम.बी.ए. केमेस्ट्री, इंजिनिअर, सेल्स एक्झिक्युटिव्ह आदींसाठी एकूण १९३ रिक्त पदे असल्याचे ७ उद्योजकांनी https:// rojgar. mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन कळवले आहे. इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळावर पदांसाठी ऑनलाइन अर्ज करावा.

बातम्या आणखी आहेत...