आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाभिमानी रोजगार पॅटर्न:महापालिकेतर्फे तृतीयपंथी, वारांगनांना रोजगार; ३२ जणांना कामाचे प्रशिक्षण

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तुळजापूर रोडवरील बायोएनर्जी प्रकल्पात काम

महानगरपालिकेच्या वतीने वारांगना आणि तृतीयपंथी यांना कायमस्वरूपी रोजगार देण्याच्या उद्देशाने स्वाभिमानी रोजगार पॅटर्न राबवण्यात आला. तुळजापूर रोडवरील बायोएनर्जी प्रकल्पात सुमारे ३२ जणांना रोजगार देण्यात येणार आहे. त्यापूर्वी त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. कचरा विलगीकरण करणे आदी कामे त्यांना देण्यात आली. पहिल्या टप्प्यात १२ जणांची निवड करून त्यांना काम देण्यात आले.

तुळजापूर रोड येथील बायोएनर्जी कंपनीत महानगरपालिका, पोलिस आयुक्तालय, बायो एनर्जी सिस्टिम प्रा. लि., क्रांती महिला संघ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सशक्तीकरण, सबलीकरण व रोजगार कार्यक्रम आणि माझी वसुंधराअंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी पोलिस आयुक्त हरीश बैजल, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, पालिका उपायुक्त धनराज पांडे, पालिका सहायक आयुक्त विक्रम पाटील, बायोएनर्जी कंपनीचे संचालक सारंग भांड, महिला क्रांती संघाच्या रेणुका जाधव आदी उपस्थित होते.

किमान वेतनाच्या आधारावर कंपनी दरमहा वेतन देणार
सहानुभूती अथवा तात्पुरती मदत करण्याऐवजी वारांगना व तृतीयपंथीयांना स्वाभिमानाने स्वतःच्या पायावर उभे करून त्यांना कायमस्वरूपी रोजगार देण्याच्या उद्देशाने स्वाभिमानी रोजगार पॅटर्न राबवण्यात आले. कायमस्वरूपी रोजगार देण्याच्या उद्देशाने भोगाव येथील बायोएनर्जी सिस्टिम प्रा. लि. च्या माध्यमातून रोजगार देण्यात आला. बायोएनर्जी कंपनी कचऱ्यावर प्रक्रिया करून वीजनिर्मितीचे काम करते. तेथे त्यांना पहिल्या टप्प्यात १२ जणांना रोजगार देण्यात येणार आहे. त्यांना किमान वेतनाच्या आधारावर कंपनी दरमहा वेतन देणार आहे. सोलापुरातील क्रांती महिला संघाने महापालिकेकडे ५० जणांची यादी उपलब्ध करून दिली होती.

त्यापैकी कामाची गरज असलेल्या आणि किमान कौशल्य आधारावर १२ जणांची निवड करून प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर नियुक्ती करण्यात आली. कचरा विलगीकरणाच्या कामाबरोबरच अन्य काही कामे त्यांना देण्यात येणार आहेत. त्यासाठी ३२ जणांची नियुक्ती करण्यात येणार आहे. शहरातील प्रत्येक कचरा संकलन केंद्रावर (ट्रान्सफर स्टेशन) चार याप्रमाणे आठ केंद्रांवर ही नेमणूक केली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...