आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चॅरिटेबल ट्रेनिंग सेंटर:गरज तेथे प्रशिक्षित मनुष्यबळासाठी रोजगाराभिमुख शिक्षण सुविधा

सोलापूर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकनेते भाऊसाहेब चॅरिटेबल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून कौशल्य विकासाचे विविध उपक्रम राबवून रोजगारनिर्मितीचा आमचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन, बार्शी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कोषाध्यक्ष वर्षा ठोबरे यांनी केले. बार्शीतील श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयात एलबीसीटीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या टॅली कोर्स व संगणक कक्ष उद्घाटन समारंभप्रसंगी बोलत होत्या. ठोंबरे म्हणाल्या, १२ वी तसेच पदवीनंतर काय करायचे असा प्रश्न ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर आहे. ते चाचपडत आहेत. रोजगाराभिमुख शिक्षणाची गरज आहे. जेथे गरज आहे तेथे प्रशिक्षित पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. ही पोकळी भरून काढण्यासाठी स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून हाताला रोजगारनिर्मीतीच्या दृष्टीने काय करता येईल असा विचार केला. सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही एलबीसीटी सेंटरची स्थापना केली आहे.

या सेंटरद्वारे विद्यार्थ्यांसाठी जेसीबी ऑपरेटर ट्रेनिंग व टॅली सर्टिफिकेट कोर्स सुरू केले आहेत. भविष्यात असे अनेक कौशल्य विकासाचे कोर्सेस सुरू करणार आहोत. एलबीसीटी सेंटरच्या माध्यमातून कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...