आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रकार सारिका बाेईटे-पवार:कमी भांडवलात उद्योग सुरू करून महिलांनाे सक्षम व्हा

साेलापूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कमी भांडवलात उद्याेग सुरू करून प्रत्येक टप्प्यात त्याची व्याप्ती वाढवली तर यशस्वी व्हाल. महिला मुळातच चिकाटी आणि संयमी असतात. हे उद्योजकीय गुण आहेत. याच गुणांवर त्या यशस्वी उद्योजक हाेऊ शकतील, असे पत्रकार सारिका बाेईटे-पवार यांनी येथे सांगितले.

उद्योग बँक माजी सेवक सांस्कृतिक मंडळ व रोटरी क्लब ऑफ सोलापूर एमआयडीसीच्या वतीने आयाेजित गणेशोत्सव बौद्धिक व्याख्यानमालेत त्या बोलत हाेत्या. ‘महिलांनो, घ्या उद्योग भरारी’ या विषयावर मंगळवारी त्या बाेलत हाेत्या. पुढे म्हणाल्या, ‘‘महिला जन्मत: सक्षम आणि चिकाटी असतात. श्रम करण्याची क्षमता अधिक असते. योग्य मार्गदर्शन व पाठबळ मिळाल्यास त्या यशस्वी उद्योजिका बनू शकतात. जेव्हा महिला उद्योग उभारण्यासाठी प्रयत्नशील असतात, तेव्हा त्यांना अनेक अडचणी येतात. बँका ही त्यांच्यावर लवकर विश्वास दाखवत नाहीत. अशा वेळी महिलांनी हिम्मत हरता कामा नये. पहिल्या वर्षी तोटा होईल. दुसऱ्या वर्षी बाजारपेठेचा अंदाज घेऊन उद्योग सुरू ठेवायचा आणि तिसऱ्या वर्षी भरपूर नफा कमवायचा. हे यशस्वी उद्याेगाचे समीकरणच आहे.’’

बातम्या आणखी आहेत...