आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिप्परगा तलावातून पूर्वी कालव्याने शहरासाठी पाणी सोडले जायचे. नंतर पाणी सोडणे बंद झाले. कालव्याच्या निम्म्याअधिक जागेवर अतिक्रमण करत अनेकांनी झोपड्या वसवल्या. ते अतिक्रमण काढणे पालिकेला शक्य झालेले नाही. दरम्यान, राहिलेली खुली जागा वाचवण्यासाठी महापालिकेने वाणिज्य, बाग आणि रस्त्यासाठी आरक्षण टाकण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, यामुळे अतिक्रमणापासून मुक्ती मिळेल का, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. कालव्यावर अतिक्रमण झालेली जागा सोडून अन्य खुल्या जागेवर महापालिकेने आरक्षण टाकले आहे. रूपा भवानी, बुधवार पेठ, चंडक पाॅलिटेक्निक काॅलेज, आयुर्वेद काॅलेज, नागोबा मंदिर परिसरातील जागेचा यात समावेश आहे.
महापालिकेने यापूर्वी शहरात अनेक ठिकाणी आरक्षण टाकले. ज्या कामासाठी आरक्षण टाकले त्यासाठी वापर केला नाही. जागा मालकांना मोबदला देऊन हस्तांतरण केले नाही. याचे कारण पालिकेकडे भूसंपादन करण्यासाठी पैसे नाहीत. जागेचा योग्य वापर केला नाही म्हणून यापूर्वी आरक्षित असलेल्या जागांचे मालक महापालिकेला नोटीस पाठवून जागा परत मागत आहेत. असे असताना महापालिकेने रूपा भवानी मंदिर परिसरातील कालव्याच्या जागेवर आरक्षण टाकले आहेत. १७ नोव्हेंबर रोजी पालिका उपसमितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
अतिक्रमण होताना सिंचन विभाग, महापालिकेने काही केलेच नाही कालव्याच्या जागेवर अतिक्रमण हाेत असताना सिंचन विभाग आणि महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभाग यांनी काहीच केले नाही. कालव्याचे अस्तित्व संपल्यावर अतिक्रमण झालेल्या जागा सोडून उर्वरित जागेवर आरक्षण टाकण्यात आले. त्यामुळे भविष्यकाळात त्या जागांवर जे अपेक्षित आहे ते होणे शक्य नाही. उलट त्या जागेच्या परिसरात आरक्षित असलेल्या खासगी जमिनींवरील आरक्षण काढण्यास महापालिका विकास आराखड्यात वाव असेल.
सिंचन विभागास कळवले पूर्वी शहरासाठी त्या कालव्यातून पाणी सोडण्यात येत होते. कालवा आता बंद आहे. कालव्याच्या जागेवर अतिक्रमण होत आहे. खुल्या सहा जागांवर आरक्षण निश्चित करण्यात आले. यासंबंधी सूचना व हरकती मागवण्यात येत आहेत. याची माहिती सिंचन विभागाला देण्यात आली आहे.'' लक्ष्मण चलवादी, महापालिका प्र. नगर अभियंता
आरक्षणाचा जागा आणि त्याचा प्रकार Áरूपा भवानी मंदिराच्या पूर्व बाजूस मेला ग्राऊंडमधील कालव्याची वाणिज्य वापर Áरूपा भवानी मंदिराच्या पश्चिमेकडील जागा बागेसाठी वाढीव जागा ठेवली आहे. Áचंडक पाॅलिटेक्निक काॅलेज हाॅस्टेल मागील बाजूची जागा बागेसाठी वापर Áआयुर्वेद काॅलेजच्या समोरील जागा १८ मीटर रुंद रस्ता Áनागोबा मंदिर ते शिव-विजय मंगल कार्यालयालगतची जागा ग्रीन बेल्ट Áकालव्याच्या पाठीमागील जागा वाढीव बागेसाठी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.