आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:कुरनूर धरणावर लुटला पक्षी निरीक्षणाचा आनंद

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सूर्याच्या कोवळ्या किरणांनी कुरनूर (ता. अक्कलकोट) धरणातील चकाकणारे पाणी, हवेतील गारवा अन् पक्षांचा किलबिलाट अशा निसर्गरम्य वातावरणात सोलापुरातील निसर्गप्रेमींनी स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांचे निरीक्षण केले. त्यांच्या वैशिष्ट्यांची माहिती घेतली.

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली (५ नोव्हेंबर) ते ज्येष्ठ पक्षी तज्ञ डॉ. सलीम अली यांची जयंती (१२ नोव्हेंबर) हा कालावधी पक्षी सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो. त्या निमित्ताने वनविभाग, वाइल्फलाइफ कॉन्झर्व्हेशन असोसिएशन (डब्ल्यूसीएस) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. ६) कुरनूर धरण परिसरात पक्षी निरीक्षण, अभ्यास नोंदीचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी साडेसहा वाजता निसर्गप्रेमींनी कुरनूरकडे धाव घेतली. डब्ल्यूसीएस संस्थेने निसर्गप्रेमींचे गट तयार करून पक्षीनिरीक्षण केले. सुरुवातीला उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र गौर, सहाय्यक वनसंरक्षक बाबा हाके, वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक खलाणे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात झाली. निसर्गप्रेमींनी दुर्बीणच्या सहाय्याने पक्ष्यांचे निरीक्षण केले.

यावेळी डब्लूसीएस संस्थेचे शिवानंद हिरेमठ, अजित चौहान, सुरेश क्षीरसागर, संतोष धाकपाडे, काशीनाथ धनशेट्टी, विनय गोटे, शिवानी गोटे, सिद्धांत चौहान, श्रुती माने, शुभम बाबानगरे यांनी पक्षांची माहिती दिली. याप्रसंगी वनविभागाचे पवन आहेर, रुकेश कांबळे, वनपाल शंकर कुताटे, गंगाधर विभूते, तुकाराम बादणे, माजी मानद वन्यजीव रक्षक प्रा. डॉ. निनाद शहा, यशोदा आदलिंगे, अनिता शिंदे आदी उपस्थित होते.

या पक्ष्यांची घेतली माहिती
गुलाबी मैना, करडी मैना, कवडी मैना, भांगपाडी मैना , गुलाबी चटक , पांढऱ्या भुवयांचा बुलबुल, नदी सुराई, पान कावळा, चष्मेवाला, वारकरी, शिंजिर, मनुली, नाचरा, पाणकोंबडी, टिटवी, वेडा राघू, खंड्या असे विविध पक्षी पाहिल्यानंतर त्यांची वैशिष्ट्य जाणून घेतली.

बातम्या आणखी आहेत...