आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रासायनिक दूध:महिना‎ लोटूनही कारवाई नाही‎

उत्तर सोलापूर‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हाेम मैदान येथे रासायनिक दूध‎ विक्री होताना आढळले होते. या‎ घटनेला महिना उलटला तरी‎ कुठलीच कारवाई झाली नाही.‎ ताब्यात घेतलेल्या दूध नमुन्याचा‎ अहवाल महिन्यात प्राप्त हाेइल, असे‎ अन्न प्रशासनाने सांगितले हाेते.‎ परंतु, अद्याप अहवाल मिळालेलाच‎ नाही, असे अन्न विभाग प्रशासन‎ आयुक्त प्रदीप राऊत यांनी सांगितले.‎ गेल्या महिन्यात एका विक्रेत्याच्या‎ दुधातील फॅट व एसएनएफचे प्रमाण‎ पाहता स्वस्तात दूध विक्री करताना‎ इतर दूध उत्पादकांना संबंधिताचा‎ संशय आला हाेता. अन्न व औषध‎ विभागाने दुधाचे नमुने घेऊन तो दूध‎ साठा नष्ट केला होता. संशयिताने‎ दूध भेसळीची कबुली दिली हाेती.‎ हा प्रकार घडून महिना उलटला तरी‎ विभागाने कारवाई केलेली नाही.‎

बातम्या आणखी आहेत...