आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहोटगी रस्ता परिसरातील सोलापूर विमानतळाच्या जमिनीवर भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे नाव लावण्याबाबत महसूल खाते दिरंगाई करत आहे. सात-बारा उताऱ्यावर नाव लावण्याविषयी महिन्यापूर्वी पत्र दिले तरीही काहीच हालचाली झाल्या नाहीत. १९५३ साली झालेल्या भूसंपादनाचा निवाडा आधी सापडत नव्हता. तो सापडल्यानंतरही महसूल प्रशासनाकडून चालढकल सुरू आहे. प्राधिकरणाचे नवी दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोलापूरला डेरेदाखल व्हावे लागले.
विमानतळाच्या उर्वरति ६१ एकरवर आता ७० वर्षांनी मूळ मालकाचे नाव लागणार आहे. त्यानुसार उताऱ्यावर नाव लावणे, त्यानंतर संपादति जमिनीची पूर्ण मोजणी करणे व हद्द निश्चतिी करून अंतिम नकाशा तयार करण्यात येणार आहे.
२०१८ साली फेरफार रद्द करून महाराष्ट्र सरकारचे नाव लावले मजरेवाडी येथील सर्व्हे क्रमांक ७१ आणि ७३ या फेरफार नोंदी खासगी व्यक्तीच्या नावे होत्या, पण जमीन भारतीय विमानतळासाठी संपादति करण्यात आली होती. सप्टेंबर २०१८ मध्ये तहसीलदाराने खासगी व्यक्तींच्या नावे असलेले फेरफार रद्द करून महाराष्ट्र शासनाचे नाव लावण्याचे आदेश दिले होते. धनशेट्टी राजमाने, आनंद भोपळे व चंद्रशेखर कोळी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, पण या तिघांच्याही याचिका न्यायालयाने फेटाळल्या होत्या. या तिघांच्या नोंदीच चुकीच्या पद्धतीने घेतल्याचे पुनर्विलोकनात आढळून आले होते.
संपादति जमिनीची होणार मोजणी नवीन गट क्रमांक ७१/१ व ७१/२ (एकूण क्षेत्र ६१ एकर) यावर भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे नाव लावल्यानंतर पुढील प्रक्रिया संपूर्ण जमिनीची मोजणी करण्यात येणार आहे. शिवाय संपूर्ण संपादति जमिनीच्या हद्दी निश्चति करून अंतिम नकाशाही तयार करण्यात येणार आहे. यामुळे विमानतळासाठी कतिी जमीन ताब्यात आहे, कतिी जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले आहे? हे सुद्धा मोजणीनंतर समोर येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.