आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गून्हेवृत्त:तहसीलदारांच्या आदेशानंतरही शेतरस्ता अडवला, तिघे तडीपार

करमाळा7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तहसीलदार यांचा आदेश डावलून व गुन्हा दाखल केल्यानंतरही शेतरस्ता अडवला. याप्रकरणी येथील न्यायालयाने तिघांना तीस दिवसांसाठी गावातून तडीपार करण्याचे आदेश दिले. शंकर रान्ने (वय ४२), भिवाजी जाधव (वय ४९), सुदाम जाधव (वय २९, सर्व रा. कंदर) अशी स्थानबद्ध केलेल्यांची नावे आहेत.

कंदर येथील गट क्रमांक ४९३, ४८२ मधील पुनर्वसन रस्त्यावरून शेतकरी सोपान देवडकर यांच्यासह शेतकऱ्यांचा सतत वाद चालू होता. तहसीलदार समीर माने यांनी रस्त्यास मंजुरी देऊन पुनर्वसन विभागाचा रस्ता पूर्वीचा असल्याचा निकाल दिला होता. तरीही संशयित व त्यांचे साथीदार त्या रस्त्यावरुन ये जा करण्यास देवडकर यांच्यासह इतर शेतकऱ्यांना विरोध करत होते. त्यामुळे सतत भांडण-तंटा होत होता. तहसीलदार यांचा आदेश डावलून देखील रस्ता आडवण्यात येत होता. त्यामुळे देवडकर यांनी फिर्याद दिल्यानंतर संशयितांवर गुन्हे दाखल केले होते. तरीही ते ऐकत नव्हते. नंतर रस्ता अडवल्यामुळे त्यांच्यात भांडणे होऊ नये, सरकारी आदेशाचे पालन व्हावे, यासाठी तिघांनाही फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५१/३ नुसार अटक केली. त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले. न्यायालयाने तिघांना तीस दिवसांसाठी गावातून तडीपार करण्याचे आदेश दिले. यासाठी पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, साहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन जगताप, पोलिस उपनिरीक्षक विनायक माहुरकर यांनी प्रयत्न केले.

बातम्या आणखी आहेत...