आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका प्रशासन:घरावर झाड पडले तरी पालिका बेदखल

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेत प्रशासन आल्यानंतर लोकप्रतिनिधींचे वर्चस्व संपुष्टात आले. त्यामुळे प्रशासकीय कारभारात माजी नगरसेवकांची कामे दुर्लक्षली जात आहेत. शुक्रवार पेठेत शुक्रवारी माजी नगरसेवक अमर पुदाले यांच्या घराजवळील झाड एका घरावर पडले. याबाबत पालिका उद्यान विभागास कळवले. पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांना फोन केला. २४ तास उलटून गेले तरीही झाड बाजूला केले नाही.

शुक्रवारी सकाळी झाड पडले. माजी नगरसेवक पुदाले हे उद्यान विभागाच्या कार्यालयात गेले. तेथील कर्मचाऱ्यांना शुक्रवार पेठ कोठे आहे याची माहिती नव्हती. माहिती दिल्यानंतरही शनिवारी सकाळपर्यंत ते झाड तसेच पडून होते. याबाबत पालिका उद्यान विभाग प्रमुख रोहित माने यांना फोन केला असता, त्यांचा फोन बंद होता. माजी नगरसेवक पुदाले यांनी नाराजी व्यक्त केली. महापालिका नागरिकांची कामे करत नाही. लोकप्रतिनिधी नसल्याचा गैरफायदा पालिका अधिकारी घेत असल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...